मुंडे भगिनींची मंत्रालयात बैठक
By Admin | Updated: August 17, 2016 04:21 IST2016-08-17T04:21:55+5:302016-08-17T04:21:55+5:30
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिनी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत अहमदनगर-बीड-परळी रेल्वे

मुंडे भगिनींची मंत्रालयात बैठक
मुंबई : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिनी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या रेल्वेमार्गाचे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना पंकजा यांनी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाला यावेळी दिल्या.
या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने भूसंपादन करून जमीन रेल्वे प्रशासनाला द्यावी, काही गावांमध्ये भूसंपादनाच्या मोबदल्याविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधीत प्रत्येक तालुक्यात नोडल आॅफिसरची नेमणूक करु न या अडचणी तात्काळ दूर कराव्यात. जिल्हास्तरावरही या कामी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे त्यांनी सांगितले.
खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या की, केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी खूप मोठा निधी प्रथमच उपलब्ध करु न दिला आहे. मंजूर निधीपैकी बहुतांश निधी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाला वर्ग केला आहे. राज्य शासनानेही बहुतांश निधी उपलब्ध करु न दिला आहे. (विशेष प्रतिनिधी)