भिवंडी पालिकेची बैठक पे बैठक

By Admin | Updated: August 1, 2016 03:30 IST2016-08-01T03:30:19+5:302016-08-01T03:30:19+5:30

धोकादायक इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे कोणतीही व्यवस्था नाही.

Meetings of Bhiwandi Municipal Council meeting | भिवंडी पालिकेची बैठक पे बैठक

भिवंडी पालिकेची बैठक पे बैठक


भिवंडी : धोकादायक इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे कोणतीही व्यवस्था नाही. या इमारती पाडण्यासाठी पालिकेने पोलिसांचे सहकार्य मागितले आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी या इमारतीतील मालक आणि भाडेकरूंची बैठक पालिका-पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी घेतली. पण, हाती तोडगा नसल्याने, पुनर्वसनाची व्यवस्था नसल्याने, त्याबाबतचे धोेरण नसल्याने ती निष्फळ ठरली.
गैबीनगरच्या या इमारतीत १४ कुटुंबे होती. २६ वर्षे जुन्या इमारतीत मालक-भाडेकरूंचा वाद न्यायालयात गेला होता. तो मिटवण्यासाठी पालिका व स्थानिक पोलिसांनी प्रयत्न केला. पण, वाद न मिटल्याने नऊ कुटुंबे या इमारतीतून इतरत्र राहावयास गेली. उरलेली कुटुंबे या दुर्घटनेत सापडली.
>अतिधोकादायक ३७८
भिवंडीत सध्या १५०० पेक्षा जास्त अनधिकृत इमारती असून त्यातील ८०० पेक्षा जास्त इमारती धोकादायक आहेत. त्यातील ३७८ अतिधोकादायक असल्याची माहिती मिळते. पण, पालिका काहीही कारवाई न करता हातावर हात धरून बसली.
ज्या ठिकाणी रविवारी सकाळी दुर्घटना घडली, त्या इमारतीच्या आजूबाजूस सहा बेकायदा इमारतींचे बांधकाम सुरू असल्याची चर्चा रहिवाशांत सुरू होती.

Web Title: Meetings of Bhiwandi Municipal Council meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.