संमेलन व्हावेच; मात्र पारदर्शी, स्वयंपूर्ण!
By Admin | Updated: November 29, 2014 01:34 IST2014-11-29T01:34:18+5:302014-11-29T01:34:18+5:30
ग्रंथप्रसाराला चालना मिळावी या हेतूने 1878 साली न्या. रानडे व लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी पहिले मराठी साहित्य संमेलन भरवले.

संमेलन व्हावेच; मात्र पारदर्शी, स्वयंपूर्ण!
औरंगाबाद/पुणो : ग्रंथप्रसाराला चालना मिळावी या हेतूने 1878 साली न्या. रानडे व लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी पहिले मराठी साहित्य संमेलन भरवले. त्यानंतर काही अपवाद वगळता गेली 87 वर्षे भरवले जाणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कायम वादात सापडले आहे. साहित्य संमेलन हा रिकामटेकडय़ांचा उद्योग असून, संमेलन आणि अनुषंगिक बाबी या उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार असल्याची टीका ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी शुक्रवारी पुण्यात केली. यावर संमेलन तर व्हायलाच हवे; मात्र ते स्वयंपूर्ण आणि पारदर्शी असावे, असे मत पुणो आणि मराठवाडय़ातील साहित्यिकांनी व्यक्त केले.
मातृभाषेतील शिक्षण हे शिक्षणातील महत्त्वाची बाब आहे. मात्र, त्यासाठी इंग्रजी शाळा बंद करण्याचे समर्थन करता येणार नाही. मराठी भाषेला प्राधान्य आणि त्याला इंग्रजीचा आधार शिक्षणात दिला पाहिजे. त्यासाठी आधी मराठीची सोय सगळीकडे करून इंग्रजी द्वितीय भाषा म्हणून पाहिली जावी, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी दिली. (प्रतिनिधी)
महापुरुषांचे विचार पुतळ्यांत अडकवू नका - नेमाडे
पुणो : महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार रुजलेले आहेत. मात्र त्यांचे विचार पुतळ्यामध्ये अडकवून ठेवू नका. या महापुरुषांच्या विचारांची मांडणी राजकारणात दिसत नाही, त्यांच्या विचारांचे राजकारण सोयीने केले जाते, असा टोला ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी लगावला. तसेच फुलेवाडा हा जातीत न अडकता दलित बहुजनांचे केंद्रबिंदू व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ समता परिषदेने नेमाडे यांना महात्मा फुले समता पुरस्काराने देऊन गौरवल़े
या पुरस्काराच्या वितरणावेळी ते बोलत होते. वाहनचालकांनी हेल्मेट घातली आहेत की नाहीत, याची शहानिशा पोलीस करीत आहेत. मात्र, त्यापेक्षा हा वेळ डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी शोधण्यात घालवावा, अशी परखड टीका नेमाडे यांनी हेल्मेट सक्तीवर केली. तसेच पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातच विचारवंतांवर हल्ल्याच्या घटना घडतात, बीड, परभणीसारख्या भागात मात्र असे हल्ले होत नाहीत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मराठी साहित्य संमेलनाच्या अर्थकारणावर टीका अनेक जण करतात. मात्र पर्यायी अर्थकारण उभे करणो तितके सोपे नाही. टीकाकारांनी अर्थ उभारणीस मदत करावी़
- कौतिकराव ठाले-पाटील , अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद
समाजाच्या र्सवकष मदतीनेच संमेलन भरते. कोणाच्या मदतीतून संमेलन व्हावे वा होऊ नये ही नेहमीच चर्चेतील बाब राहते. अमराठी भागात संमेलन व्हावे असे माङो मत आहे. महाराष्ट्राबाहेरही मराठी माणूस, भाषा यावर प्रेम करणारी मंडळी आहेतच की! घुमानला होणारे संमेलन हे त्यादृष्टीने औचित्यपूर्ण व गौरवशाली आहे. किती मराठी माणसे येतील यावर यशस्वीता ठरवली जाऊ नये.
- फ. मुं. शिंदे,अध्यक्ष, अ़भा़म. साहित्य संमेलन
भालचंद्र नेमाडे यांच्या बोलण्यात विसंगती आहे. लोकशाही पद्धतीत त्यांना आपले मत व्यक्त करण्याचा निश्चितच अधिकार, स्वातंत्र्य आहे. त्यांना महामंडळाला काही सूचवायचे असेल तर त्याचे स्वागत आहे.
-डॉ. माधवी वैद्य , अध्यक्षा, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ
साहित्य संमेलनाच्या औचित्याबाबत प्रत्येकाचे स्वतंत्र मत असू शकते. मात्र सध्या संमेलनाला आलेले मंचीय उत्सवाचे रुप फार बरे वाटत नाही. त्यातून सामान्य रसिकाला काय मिळते याबाबत मी साशंक आहे. कायमस्वरुपी निधी कोश अधिक सक्षम बनवून स्वतंत्र अर्थकारण उभे करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.
- सुधीर रसाळ, ज्येष्ठ समीक्षक
नेमाडेंसारखा श्रेष्ठ लेखक सातत्याने संमेलनविरोधी भूमिका मांडतो तेव्हा मला वाटते, सुधारणोला बराच वाव आहे. संमेलन नावाच्या या भाषिक उत्सवात काहीतरी एकसुरीपण आले आहे हे नक्की. संमेलनातून साहित्य जागर आणि समविचारी व्यक्तींचा संवाद होतो तो स्वागतार्हच म्हणता येईल. हा साहित्य उत्सव पारदर्शी कसा होईल याचे प्रयत्न झाले पाहिजेत.
- दासू वैद्य, कवी
मराठी साहित्य संमेलनास ऐतिहासिक वारसा आहे. काळाच्या ओघात संमेलनाचे स्वरुप बरेच बदलले हे नाकारता येणार नाही. पण संमेलन ही केवळ लेखकांची नव्हे तर वाचकांचीही सांस्कृतिक गरज आहे.
- ¬षीकेश कांबळे, लेखक-समीक्षक