कर्जतमध्ये तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक

By Admin | Updated: June 29, 2016 02:40 IST2016-06-29T02:40:04+5:302016-06-29T02:40:04+5:30

तालुका क्रीडा संकुलाची बैठक आमदार तथा तालुका क्रीडा संकुल समिती अध्यक्ष सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

Meeting of taluka sports complex committee in Karjat | कर्जतमध्ये तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक

कर्जतमध्ये तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक


कर्जत : तालुका क्रीडा संकुलाची बैठक आमदार तथा तालुका क्रीडा संकुल समिती अध्यक्ष सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी जिल्हा कार्यालयात ४ मार्च २०१५ रोजी सविस्तर चर्चा होऊन कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे जागेची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून अंदाजपत्रक व आराखडे तयार करून शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. त्यासाठी शासनाने २५० लाख रु पयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली होती. मात्र ही जागा मिळण्यास गावकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याने ही जागा समितीच्या ताब्यात मिळाली नाही. मात्र २५ मे २०१६ च्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार कर्जत तालुक्यातील मौजे वांजळे येथील गुरचरण जमिनीपैकी एक हेक्टर जागा संकुलासाठी देण्यात आली. नवीन जागेच्या अनुषंगाने नवीन अंदाजपत्रक आराखडे तयार करून शासनाच्या प्रशासकीय मान्यतेस प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
संकुल उभारणीचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्यास दर्जेदार व वेळेत प्रकल्प पूर्ण होत नसल्याचा अनुभव आहे. यामुळे वास्तुविशारदाकडून तालुका क्रीडा संकुलाचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्याचे तसेच आराखड्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मान्यता घेऊन आणि वेळोवेळी प्रकल्पाच्या कामाची तपासणी करूनच प्रकल्प पूर्ण करण्याचे सर्वानुमते या बैठकीत ठरले. (वार्ताहर)
>प्रस्ताव सादर करणार
शासनाची ३ हेक्टर ०६ आर जमीन संकुलासाठी उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी तहसीलदार तथा तालुका क्रीडा समिती कार्याध्यक्ष रवींद्र बाविस्कर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, कर्जत नगरपरिषद प्रतिनिधी कनिष्ठ अभियंता नीलेश चौडीये आदी उपस्थित होते.

Web Title: Meeting of taluka sports complex committee in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.