मुख्यमंत्र्यांसोबत मातंग आरक्षणासाठी बैठक
By Admin | Updated: January 21, 2016 03:46 IST2016-01-21T03:46:20+5:302016-01-21T03:46:20+5:30
अनुसूचित जातीमध्ये मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण देण्यासाठी ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन भारतीय

मुख्यमंत्र्यांसोबत मातंग आरक्षणासाठी बैठक
मुंबई : अनुसूचित जातीमध्ये मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण देण्यासाठी ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. आरक्षणासाठी अखिल भारतीय मातंग संघाने बुधवारी आझाद मैदानात काढलेल्या मोर्चावेळी दानवे बोलत होते.
दानवे म्हणाले की, अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांनी पाच व्यक्तींचे एक शिष्टमंडळ तयार करावे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल. त्यात स्वतंत्र आरक्षणाबाबत कोणता ठोस निर्णय घेण्यात येईल का? यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. याबाबत गोपले म्हणाले की, अखिल भारतीय संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, भारतीय बहुजन युवक आघाडी, महिला आघाडी यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे या संघटनांमधील कुसुम गोपले, डी.बी.अडागळे, मुकुंद वायदंडे, बाळासाहेब माने आणि देवेंद्र खडसे यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाईल. केंद्र शासनाकडे मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासंदर्भात शिफारस करावी, ही मागणी असेल.