भाजपा कार्यसमितीची मुंबईत होणार बैठक

By Admin | Updated: June 28, 2014 00:34 IST2014-06-28T00:34:11+5:302014-06-28T00:34:11+5:30

येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या विस्तारित कार्यसमितीची बैठक येत्या 2 व 3 जुलै रोजी होणार

Meeting of BJP will be held in Mumbai | भाजपा कार्यसमितीची मुंबईत होणार बैठक

भाजपा कार्यसमितीची मुंबईत होणार बैठक

>मुंबई : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या विस्तारित कार्यसमितीची बैठक येत्या 2 व 3 जुलै रोजी होणार असून, या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हय़ातील राजकीय वस्तुस्थितीचा आढावा घेण्यात येईल.
भाजपा प्रदेश कार्यालयात नुकत्याच झालेल्या सरचिटणीस मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणा:या या बैठकीस पक्षाचे राज्यातील चार हजार प्रमुख नेते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक 2 जुलै रोजी होईल. सर्व जिल्हाध्यक्षांनी जिल्हय़ातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल सादर करावा, अशी सूचना दिल्याचे पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले. प्रदेश भाजपाच्या विस्तारित कार्यसमितीची बैठक 3 जुलै रोजी सकाळी दहा वाजता होईल. या बैठकीस पक्षाचे खासदार, आमदार, महानगरपालिका व नगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असे सर्व लोकप्रतिनिधी निमंत्रित केले आहेत. त्यांच्यासह  चार हजार प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहणो अपेक्षित आहेत.  (प्रतिनिधी)

Web Title: Meeting of BJP will be held in Mumbai