संमेलन निवडणूक कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: August 24, 2015 00:47 IST2015-08-24T00:47:02+5:302015-08-24T00:47:02+5:30
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी

संमेलन निवडणूक कार्यक्रम जाहीर
पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला.
येत्या मंगळवारपासून अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून, ६ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल. ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारयाद्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिल्या जातील.
तर, ३ सप्टेंबरपर्यंत दुपारी १२ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत. त्याचदिवशी अर्जांची छाननी करून सायंकाळी पाच वाजता उमेदवारांची नावे जाहीर होतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ९ सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. ५ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदारांकडील मतपत्रिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येतील. त्यानंतर ६ नोव्हेंबरला मतमोजणी पूर्ण होताच अध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.