प्रदेश काँग्रेसची चिंतन बैठक घ्या
By Admin | Updated: May 17, 2014 21:44 IST2014-05-17T19:52:17+5:302014-05-17T21:44:24+5:30
पुणे लोकसभा निवडणुकांचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर प्रदेश काँग्रेस पक्षाची चिंतन बैठक आयोजित करावी अ

प्रदेश काँग्रेसची चिंतन बैठक घ्या
अनंतराव गाडगीळ यांची पक्षश्रेष्ठांकडे मागणी
पुणे लोकसभा निवडणुकांचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर प्रदेश काँग्रेस पक्षाची चिंतन बैठक आयोजित करावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते अनंतराव गाडगीळ यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
गाडगीळ यांनी या दोन नेत्यांना ही विनंती मागणी केली असून निकाल लक्षात घेता नेते आणि प्रमुख पदाधिकार्यांची बैठक होणे आवश्यक आहे.पक्षात पुर्वी अशा बैठकांची परंपरा होती.पक्ष मजबुतीसाठी अशी बैठक आवश्यक आहे, असे म्हटले आहे.
माजी आमदार उल्हास पवार यांनीही अशाच स्वरूपाची मागणी करणार असल्याचे गाडगीळ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करताना सांगितले.