ठाणे महापौरपदासाठी शिवसेनेकडून मीनाक्षी शिंदेंची निवड  

By Admin | Updated: March 2, 2017 11:57 IST2017-03-02T11:14:36+5:302017-03-02T11:57:30+5:30

ठाणे महानगरपालिका महापौर आणि उप महापौर पदासाठी शिवसेनेकडून निष्ठावंतांच्या नावाची निवड करण्यात आली आहे.

Meenakshi Shinde's selection from Shiv Sena for Thane Mayor | ठाणे महापौरपदासाठी शिवसेनेकडून मीनाक्षी शिंदेंची निवड  

ठाणे महापौरपदासाठी शिवसेनेकडून मीनाक्षी शिंदेंची निवड  

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 2 - ठाणे महानगरपालिका महापौर आणि उप महापौर पदासाठी शिवसेनेकडून निष्ठावंतांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेनं महापौर पदासाठी मीनाक्षी शिंदे तर उपमहापौर पदासाठी रमाकांत मढवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी, मीनाक्षी शिंदे यांनी आरोग्य समितीचे सभापतीपदही भूषवले आहे. 
 
तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी अशरिन राऊत व उपमहापौर पदासाठी शारदा गायकवाड यांना रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.  दरम्यान, 131 जागांच्या ठाणे महापालिकेत 67 जागांसह शिवसेनेकडे पूर्ण बहुमत आहे.  
(देशात सध्या ‘हत्ती व सात आंधळे’ कथेप्रमाणे ‘देशभक्ती’ची कल्पना - उद्धव ठाकरे)
दुसरीकडे, शिवसेनेचे नगरसेवक सध्या अलिबागला पिकनिक करत असल्याची माहितीही समोर आली आहे.
 
 
मीनाक्षी शिंदे
 
 
रमाकांत मढवी

Web Title: Meenakshi Shinde's selection from Shiv Sena for Thane Mayor