मीनाक्षी जयस्वाल यांची मुंबईत हत्या
By Admin | Updated: December 21, 2014 00:19 IST2014-12-21T00:19:22+5:302014-12-21T00:19:22+5:30
दिग्रसच्या स्रुषा आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मिनाक्षी जयस्वाल यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले़ चोरीच्या उद्देशाने ही हत्या

मीनाक्षी जयस्वाल यांची मुंबईत हत्या
चोरीच्या उद्देशाने कृत्य : दोघांना अटक, एक फरार, दिग्रसमध्ये हळहळ
मुंबई/दिग्रस (यवतमाळ) : दिग्रसच्या स्रुषा आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मिनाक्षी जयस्वाल यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले़ चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मनिंदरसिंग बाजवा (२२) आणि विनायक चव्हाण (४०) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे़
खारघर येथील वास्तुविहार सोसायटीमध्ये मिनाक्षी जयस्वाल या एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती संतोष जयस्वाल हे मालेगाव येथे न्यायाधीश असून, ते नाशिक येथे राहतात. शुक्रवारी दुपारी ते पत्नी मिनाक्षी यांना दूरध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे खारघरमध्येच राहणारे त्यांचे फॅमिली डॉक्टर संतोषकुमार जयस्वाल यांना त्यांनी त्या ठिकाणी पाठवले. त्यावेळी त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह श्वान पथक, ठसेतज्ञ घटनास्थळी दाखल झाले. त्यानुसार अवघ्या सात तासांत पोलिसांनी दोघांना अटक केली़
खारघर सेक्टर १३ येथे राहणारा विनायक चव्हाण हा जयस्वाल कुटुंबीयांच्या परिचयाचा होता. त्यानुसार वेळप्रसंगी तो मिनाक्षी जयस्वाल यांचे वाहन चालवण्याचे काम करायचा. बाजवा व फरार असलेला हे चव्हाण याचे मित्र आहेत. दहा दिवसांपूर्वीच मिनाक्षी जयस्वाल यांनी घराच्या डागडुजीचे काम करुन घेतले होते. त्यावेळी चव्हाण याच्याच परिचयाने बाजवा व त्याच्या साथीदाराने तेथे विद्युतकाम केलेले. याच परिचयाचा गैरफायदा घेत शुक्रवारी दुपारी त्यांनी घरात प्रवेश मिळवला. परंतु घरात चोरी करत असताना जयस्वाल यांनी प्रतिकार केल्यामुळे दोघांनी त्यांची हत्या केली. त्यानंतर घरातील सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज लुटला होता.
मात्र त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल असे अपर आयुक्त फत्तेसिंह पाटील यांनी सांगितले. त्यांनी हा गुन्हा चोरीच्या उद्देशाने केल्याची कबुली दिली असून त्यामागे इतरही वेगळे काही कारण आहे का याचाही तपास सुरु असल्याचे ते म्हणाले.
दिग्रसमध्ये शोककळा
या हत्येचे वृत्त दिग्रसमध्ये येताच सर्वत्र शोककळा पसरली. अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.
महिला बालहक्क संरक्षण आयोगाची गेल्या कित्येक वर्षांपासून धुरा सांभाळणाऱ्या अॅड. मीनाक्षी संतोष जयस्वाल यांच्या आकस्मिक जाण्याने दिग्रसचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. राज्यमंत्र्याचा दर्जा असला तरी त्यांच्या वागण्यातून बडेजाव कधीही दिसला नाही. कुटुंबवत्सल मीनाक्षीताई प्रत्येक सणसमारंभाला दिग्रसला यायच्या. एवढ्या मोठ्या पदावर असतानाही त्या सर्वांमध्ये मिसळून जायच्या, चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असायचे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर माहेर असलेल्या मीनाक्षीतार्इंचा विवाह यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस येथील तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक रामनारायण जयस्वाल यांचे चिरंजीव अॅड. संतोषसोबत झाला होता. संतोष जयस्वाल हे सध्या धुळे जिल्ह्यातील मालेगाव येथे सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.
लग्नानंतर त्यांनी बी.ए. बी.एड़., एल.एल.बी.सारख्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. मुंबई उच्च न्यायालयात त्या वकिली करीत होत्या. शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या कायदेविषयक सल्लागार म्हणूनही त्यांनी सेवा दिली. अनेक वर्षांपासून कुटुंबवत्सल मीनाक्षीताई प्रत्येक सणसमारंभाला दिग्रसला यायच्या. एवढ्या मोठ्या पदावर असतानाही त्या सर्वांमध्ये मिसळून जायच्या, चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असायचे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर माहेर असलेल्या मीनाक्षीतार्इंचा विवाह यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस येथील तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक रामनारायण जयस्वाल यांचे चिरंजीव अॅड. संतोषसोबत झाला होता. संतोष जयस्वाल हे सध्या धुळे जिल्ह्यातील मालेगाव येथे सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.
लग्नानंतर त्यांनी बी.ए. बी.एड़., एल.एल.बी.सारख्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. मुंबई उच्च न्यायालयात त्या वकिली करीत होत्या. शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या कायदेविषयक सल्लागार म्हणूनही त्यांनी सेवा दिली. अनेक वर्षांपासून महिला व बालहक्कासाठी त्या लढा देत होत्या. म्हणूनच शासनाने त्यांची निवड महिला व बालहक्क संरक्षण आयोगाच्या संचालकपदी केली होती. अनेक वर्तमानपत्रातून त्यांनी कायदेविषयक लेखन केले. ‘विधी साक्षरतेने कायद्याचे राज्य’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. मीनाक्षीताईचा दिग्रसकरांनी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर हा शिवतेज संस्थेचा पुरस्कार देऊन गौरव केला. ‘लोकमत’ सखी मंचने दिग्रसची सून म्हणून त्यांचा सत्कार केला. असे हे सुस्वभावी व्यक्तिमत्त्व अचानक निघून गेल्याने दिग्रसमध्ये शोककळा पसरली आहे.
मीनाक्षीतार्इंच्या मागे पती न्या. संतोष जयस्वाल, डॉ. तेजस व डॉ. विद्यासागर ही दोन मुले आहेत. त्यांचे पार्थिव मुंबईवरून दिग्रस येथे येत असून, रविवार २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे. (प्रतिनिधी)