चारा छावण्यांमध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉलसह ध्यानाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 05:54 AM2019-05-22T05:54:18+5:302019-05-22T05:54:23+5:30
शेतकऱ्यांच्या तणावमुक्तीसाठी बीड, उस्मानाबादेत प्रशासनाचे पाऊल
![Meditation lessons with football, volleyball in fodder camps | चारा छावण्यांमध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉलसह ध्यानाचे धडे Meditation lessons with football, volleyball in fodder camps | चारा छावण्यांमध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉलसह ध्यानाचे धडे](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/aefb-hf_201905240677.jpg)
चारा छावण्यांमध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉलसह ध्यानाचे धडे
गजानन दिवाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दुष्काळाच्या संकटात अन्नदात्याचा आत्मविश्वास कमी होऊ नये, त्याच्यात अपराधाची भावना निर्माण होऊ नये. तो तणावमुक्त राहावा यासाठी प्रशासनाने चारा छावण्यांमधील वातावरण हसते-खेळते ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. फुटबॉल, व्हॉलीबॉलपासून क्रिकेटपर्यंत आणि आरोग्यापासून ध्यानधारणेपर्यंतचे विविध उपक्रम बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील चारा छावण्यांमध्ये राबविले जात आहेत.
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत सद्य:स्थितीत ७१९ चारा छावण्या सुरू आहेत. यातून चार लाख ८५ हजार ८७० जनावरांच्या चारा-पाण्याचा
प्रश्न मिटला आहे. छावण्यांमध्ये पशुधनांसोबत एक माणूस राहणे आवश्यक आहे. त्यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांनी छावणीत दिवसभर काय करायचे? अशावेळी दुष्काळी परिस्थितीच्या विचारातून तो खचून जाऊ नये, छावणीवरच त्याचे मन रमावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यातील अधिकाºयांची बैठक घेऊन आढावा घेतला. अशा उपक्रमांतून शेतकºयांचा आत्मविश्वास वाढवायला हवा, अशा सूचना त्यांनी केल्या.
फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट आदी खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. जगभरातील घडामोडी कळाव्यात म्हणून छावण्यांवर डीटीएचसह टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकºयांचे आरोग्य तपासणी शिबीर, वेगवेगळ्या पिकांसंदर्भात प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जात आहेत. अनेक ठिकाणी लेझीम खेळले जाते. काही ठिकाणी भजन, प्रवचनाचे कार्यक्रम होत आहेत. छावण्यांवर पथनाट्याच्या माध्यमातून शेतकºयांमध्ये जागृती केली जात आहे. वातावरण प्रफुल्लित ठेवण्यासाठी अनेक छावण्यांवर फुगे लावण्यात आले आहेत. घराचा कर्ता माणूस जनावरांसोबत छावण्यांवर गेल्याने गावात स्वस्त धान्य दुकानातील साहित्य घरपोच देण्याची व्यवस्था लवकरच केली जाणार आहे.
छावण्यांवर ग्रामगीता
चारा छावण्यांवर भजन, कीर्तनासह आता ग्रामगीतेच्या माध्यमातून शेतकºयांचे प्रबोधन केले जाणार आहे. विविध कार्यक्रम आणि प्रशिक्षणातून शेतकºयांना मानसिक बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- आस्तिक कुमार पांडेय, जिल्हाधिकारी, बीड
ध्यानधारणा आणि प्रशिक्षण
शेतकºयांच्या मानसिक आरोग्यासाठी छावण्यांवर ध्यानधारणा शिबीर घेतले जात आहे. शिवाय परंडा परिसरात तुलनेने पाणी जास्त असल्याने उसाचे क्षेत्र अधिक आहे. उसाऐवजी कमी पाण्याचे पीक म्हणून शेतकºयांनी हळद-आले पिकाकडे वळावे यासाठी छावण्यांवरच प्रशिक्षण दिले जात आहे.
- दीपा मुधोळ-मुंडे,
जिल्हाधिकारी, उस्मानाबाद