मेडिकल विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!

By Admin | Updated: December 27, 2014 04:52 IST2014-12-27T04:52:24+5:302014-12-27T04:52:24+5:30

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अगोदर सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी)नंतर राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी (एनईईटी) आणि आता पुन्हा सीईटी अशा

Medical students die! | मेडिकल विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!

मेडिकल विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!

धर्मराज हल्लाळे, नांदेड
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अगोदर सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी)नंतर राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी (एनईईटी) आणि आता पुन्हा सीईटी अशा बदलत्या परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे़ परीक्षेच्या रूपरेषेबाबतची माहिती राज्यातील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही़ या परीक्षा पद्धती बदलामुळे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांवर कासवगतीने ताण आणखी वाढवला आहे.
परीक्षा चार महिन्यांवर आली असताना सीईटी किती गुणांची, अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा (एनसीईआरटी) की राज्य शिक्षण मंडळाचा, तो केवळ बारावीचा की दोन्ही वर्षांचा, याची अधिकृत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी नकारात्मक गुणदान पद्धत रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे ७२० गुणांची होणारी वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा आता २०० गुणांची होईल हे अनुभवाने काढलेले अनुमान आहे. पण अधिकृत सूचना विद्यार्थ्यांना दिलेली नाही. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे (पान ४ वर)

Web Title: Medical students die!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.