वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी संघटनेचे 'काम बंद आंदोलन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 14:22 IST2021-01-11T14:19:39+5:302021-01-11T14:22:58+5:30

राज्यशासनाकडून नेहमीच या कार्यरत  वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करू असे पोकळ आश्वासन देण्यात आले. सद्य परिस्थितीतल्या कोरोना महामारीमध्ये सुद्धा हे वैद्यकीय अधिकारी फ्रंटलाईन वर एक दिवसही सुट्टी न घेता काम करत आहेत.

Medical Officers' Association's' Work Stop Movement ' for his demand | वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी संघटनेचे 'काम बंद आंदोलन'

वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी संघटनेचे 'काम बंद आंदोलन'

महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे वर्षानुवर्षे राज्यशासनाने दुर्लक्ष केल्याने नाईलाजास्तव आज दि. ११ जाने. २०२१ रोजी काम बंद आंदोलन पुकारले आहे.


वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे आज पर्यंत कधीही वैद्यकीय अधिकारी पदाची भरती प्रक्रिया झालेली नाही. त्या पदांवर आजपर्यंत वर्षानुवर्षे १२० दिवसांच्या तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी आहेत. अपघात विभाग, पोस्ट मॉर्टेम, मेडिको लीगल केसेस, कोर्ट केसेस, ब्लड बँक, महात्मा जोतीराव फुले जण आरोग्य योजना, जणांनी शिशु सुरक्षा योजना, नैसर्गिक आपत्ती दरम्यानचे नियोजन अशा अतिमहत्वाच्या ठिकाणी हे वैद्यकीय अधिकारी काम करत असतात.


राज्यशासनाकडून नेहमीच या कार्यरत  वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करू असे पोकळ आश्वासन देण्यात आले. सद्य परिस्थितीतल्या कोरोना महामारीमध्ये सुद्धा हे वैद्यकीय अधिकारी फ्रंटलाईन वर एक दिवसही सुट्टी न घेता काम करत आहेत. रुग्णाचे स्वॅब कलेक्शन पासून ते कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या शवाची योग्य ती विल्हेवाट लावण्याच्या नियोजना पर्यंतचे अति महत्वाचे काम करून सुद्धा पर्मनंट तर करणे नाहीच पण त्यांना सातव्या वेतन आयोगापासून दूर ठेवण्यात आले आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. 


वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवे मध्ये नियमित करून त्यांना सातवा वेतन आयोग लावावा, अशी माफक आणि रास्त मागणी वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेने मागणी केलेली आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १ जानेवारी २०२१ ते ७ जानेवारी २०२१ मध्ये काळ्या फिती लावून काम केले. त्याचीही दखल शासनाने न घेतल्यामुळे आज दि. ११ जानेवारी सकाळी ८.०० ते १२ जानेवारी सकाळी ०८.०० वाजे पर्यंत एक दिवस काम बंद आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रलंबित मागण्याची तात्काळ पूर्तता व्हावी ही त्यांची मागणी आहे.

Web Title: Medical Officers' Association's' Work Stop Movement ' for his demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.