वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा

By Admin | Updated: June 9, 2016 03:34 IST2016-06-09T03:34:44+5:302016-06-09T03:34:44+5:30

आगरदांडा बोर्ली-मांडला प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

Medical Officers | वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा

वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा


मुरुड : गेल्या अनेक दिवसांपासून मुरुड तालुक्यात आगरदांडा बोर्ली-मांडला प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुमे डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असून वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे तातडीने भरण्याची मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.
मुरुड तालुक्यात आगरदांडा, बोर्ली-मांडला येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व नांदगांवमध्ये प्राथमिक आरोग्य पथक आहे. बोर्ली-मांडला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे असून येथे एक पद रिक्त आहे. तर दुसरे वैद्यकीय अधिकारी दीड वर्ष प्रशिक्षणासाठी गेले असल्याने पद रिक्त आहे. आगरदांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून आजही या ठिकाणी एक पद रिक्त आहे. मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयाचीही तीच अवस्था असून या ठिकाणी तीनही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे समजते. (वार्ताहर)
>रिक्त पदे भरणार
वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे.

Web Title: Medical Officers