मेडिकल प्रवेश प्रक्रिया 18 जुलैपासून
By Admin | Updated: July 13, 2014 02:00 IST2014-07-13T02:00:19+5:302014-07-13T02:00:19+5:30
सीईटी परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार समुपदेशन व पसंतीक्रम अर्जाची प्रक्रिया (सत्र 2) 18 ते 23 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

मेडिकल प्रवेश प्रक्रिया 18 जुलैपासून
मुंबई : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार समुपदेशन व पसंतीक्रम अर्जाची प्रक्रिया (सत्र 2) 18 ते 23 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मुंबई, नागपूर, पुणो आणि औरंगाबाद या विभागीय केंद्रांवर विद्याथ्र्याना पसंतीक्रम अर्ज भरता येतील.
सीईटी परीक्षेच्या निकालानंतर समुपदेशन आणि पसंतीक्रम अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुस:या सत्रत समुपदेशन आणि पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया 18 जुलैपासून सुरू होत आहे. ग्रँट मेडिकल महाविद्यालय, भायखळा मुंबई विभागीय केंद्र, पुणो येथे बी. जे. गव्हर्नमेंट मेडिकल महाविद्यालय, औरंगाबाद गव्हर्नमेंट महाविद्यालय आणि नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल महाविद्यालयामध्ये विद्याथ्र्याकडून पसंतीक्रम अर्ज भरून घेण्यात येतील. 18 जुलै रोजी सकाळच्या 9 वाजताच्या सत्रत 1 ते 5000 आणि दुपारच्या 2 वाजताच्या सत्रत 5001 ते 6500 एसएमएल नंबरच्या विद्याथ्र्याच्या पसंतीक्रम अर्जाची प्रक्रिया पार पडेल. 19 जुलै रोजी 6501 ते 8500 सकाळच्या सत्रत आणि 8501 ते 1100 एसएमएल नंबरच्या विद्याथ्र्याना दुपारच्या सत्रत पसंतीक्रमाची प्रक्रिया पार पाडता येईल. (प्रतिनिधी)
20 ते 23 जुलैर्पयत पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार असून, याबाबतचे वेळापत्रक वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.