माझ्याविरोधात मीडिया ट्रायल : झाकीर नाईक
By Admin | Updated: July 11, 2016 05:24 IST2016-07-11T05:24:58+5:302016-07-11T05:24:58+5:30
बांगलादेश स्फोटातील दहशतवाद्यांचे इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे झाकीर नाईक कनेक्शन उघड झाल्यानंतर नाईक यांच्याविरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

माझ्याविरोधात मीडिया ट्रायल : झाकीर नाईक
मुंबई : बांगलादेश स्फोटातील दहशतवाद्यांचे इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे झाकीर नाईक कनेक्शन उघड झाल्यानंतर नाईक यांच्याविरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
एकीकडे नाईक यांच्याविरोधात वातावरण तापत असतानाच आपल्याविरोधात मीडिया ट्रायल सुरू असल्याचा कांगावा झाकीर नाईकने केला आहे.
बांगलादेश स्फोटातील सहभागी दहशतवादी आणि आयसीसमध्ये दाखल होण्यासाठी निघालेल्या संभाव्य दहशतवाद्यांनी झाकीर नाईककडून प्रेरणा मिळाल्याचे तपास यंत्रणांकडे कबूल केले.
त्यानंतर नाईकवर बंदीची मागणी पुढे येत आहे. नाईक यांचा पीस टीव्ही आणि भाषणांमुळे दहशतवादाला खतपाणी मिळत असल्याचा आरोप होत आहे. नाईकने काही व्हिडीओंच्या माध्यमातून स्वत: निर्दोष असल्याचा दावा केला आहे. (प्रतिनिधी)