शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पुलवामा घटनेआड मोदींकडून जमिनींचे सौदे, मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 21:22 IST

पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेत या घटनेआडून आदिवासी व दलितांच्या जमिनी खाण मालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला

 सांगली - पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेत या घटनेआडून आदिवासी व दलितांच्या जमिनी खाण मालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला, अशी टीका नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सांगलीत केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आघाडीच्यावतीने सांगलीच्या स्टेशन चौकात महिला मेळावा पार पडला. यावेळी महिला काँग्रेसच्या प्रभारी सोनलबेन पटेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा पूजा मोरे, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील उपस्थित होत्या. पाटकर म्हणाल्या की, देशातील सरकार हे जाती-जातीत विष पेरणारे, महिलांविरोधी, आदिवासी, दलितांना उद्ध्वस्त करणारे, देशात कंपनीराज आणू पाहणारे आहे. त्यामुळे त्यांना सत्तेवरून हटविणे भारतीयांचे कर्तव्य आहे. पुलवामाची घटना घडल्यानंतर त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न सरकारने केला. या घटनेने देश हादरला असताना, तब्बल १ लाख ७0 हजार हेक्टर जमिनींचा सौदा खाण कंपन्यांशी करण्यात आला. निवडणुका संपताच गोरगरीब आदिवासी, दलितांच्या जमिनी या कंपन्या ताब्यात घेतील. निसर्गाची नको तेवढी हानी करून आपल्या देशाचे, भौगोलिक परिस्थितीचे शोषण करतील. या सौद्याबरोबरच अदानीच्या कंपनीला आठ विमानतळही त्यांनी विकून टाकली. अशाप्रकारच्या देशविरोधी गोष्टी हे सरकार करीत आहे. ब्रिटिश जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांनी एक कंपनी आणली होती. मात्र नरेंद्र मोदी या देशात हजारो कंपन्या आणून कंपनीराज करू पाहताहेत. या देशात कंपन्या कधीही कर्जबाजारी होत नाहीत, मात्र कष्टकरी, शेतकरी नेहमीच कर्जबाजारी राहतो, हे दुर्दैव आहे. देशातील १ टक्का लोकांकडेच देशाची ८0 टक्के संपत्ती एकवटण्याचे हेच एकमेव कारण आहे. जनआंदोलने आणि पक्ष जेव्हा एकत्र येतात, तेव्हा देशविरोधी गोष्टींना रोखण्याचा विषय असतो. त्याचप्रमाणे देशाच्या हिताविरोधात काम करणाºयांना रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असेही पाटकर म्हणाल्या. सोनलबेन पटेल म्हणाल्या की, मोदींनी ज्या गुजरात पॅटर्नचा गाजावाजा देशभर केला, तो निव्वळ फसवा होता. याठिकाणच्या महिलांच्या, सामान्य लोकांच्या समस्या अन्य राज्यांप्रमाणेच आहेत. कोणताही विकास न करता विकासाचा दावा ते करीत आहेत. शिक्षण व्यवस्था महाग करून गरिबांच्या मुला-मुलींना या प्रवाहापासून रोखण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. त्यामुळे त्यास मतांमधून विरोध केला पाहिजे. पूजा मोरे म्हणाल्या की, मुलींना पळवून नेण्याची भाषा करणारे, मुलींवर अत्याचार करणारे आणि मराठा समाजाच्या मोर्चाची, त्यांच्या मुलींची थट्टा करणारे हे शिवसेना-भाजपचे सरकार आहे. या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात आता केवळ शेतकरीच आत्महत्या करीत नसून, त्यांच्या मुलीसुद्धा आत्महत्या करू लागल्या आहेत. या परिस्थितीतही या सरकारला या गोष्टीची खंत व शरम वाटत नाही. त्यामुळे झाशीच्या राणीप्रमाणे आता महिलांनी पेटून उठावे आणि भाजप सरकारला सत्तेवरून खेचावे, असे आवाहन त्यांनी केले. कॉँग्रेसच्या मनीषा तिवारी, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा रोटे, राष्टÑवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विनया पाठक, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ, पूजा पाटील यांनी भाषणे केली. यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, नगरसेविका रोहिणी पाटील, मालन मोहिते, सुवर्णा पाटील, शुभांगी साळुंखे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरNarendra Modiनरेंद्र मोदीsangli-pcसांगलीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक