शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीवरील पूल मोजतोय घटका

By admin | Updated: August 6, 2016 01:01 IST

भीमा नदीवर असलेला पूल शेवटची आऊट घटका मोजत असून, हा पूल कधी कोसळेल आणि वाहनांना कधी जलसमाधी मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही

दौंड : दौंड-नगर रस्त्यावर भीमा नदीवर असलेला पूल शेवटची आऊट घटका मोजत असून, हा पूल कधी कोसळेल आणि वाहनांना कधी जलसमाधी मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही. तरीदेखील शासनाच्या दुर्लक्षामुळे या पुलावरून वाहतुकीची वर्दळ सुरूच आहे. शासनाला या पुलाची डागडुजी करण्यासाठी वेळ नसल्याची वस्तुस्थिती आहे. मुळातच पुलावरील अरुंद रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्यासह पुलाचे खांब झिजत चालले आहेत. एखादे मोठे वाहन भरधाव या पुलावरून गेल्यावर पुलाला हादरे बसतात.सदरचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला आहे. या पुलासंदर्भात वेळोवेळी खबरदारीचे उपाय म्हणून ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले आहे. मात्र, केवळ शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा पूल कमकुवत होत चालला आहे. श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे जाण्यासाठी राज्य आणि परराज्यातील भाविकांना याच पुलावरून प्रवास करावा लागतो. तसेच अन्य मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी हा एकमेव पूल आहे. या पुलासंदर्भात विपरित घटना घडली, तर नवीन पूल तयार होईपर्यंत दौंड-नगर वाहतूक बंद राहील. यात सर्वसामान्य जनतेसह शासनाचेही नुकसान होऊ शकते. या पुलाव्यतिरिक्त नगरकडे जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. (वार्ताहर)>...तर वाहनांना जलसमाधी भीमा नदीवरील पुलाला पाहिजे तसे भक्कम संरक्षक कठडे नाहीत, तर या पुलावर रात्रीच्या वेळेला अंधाराचे साम्राज्य असते. एखाद्या वेळेस वाहनावरील चालकाचा ताबा सुटला, तर वाहन सरळ नदीत कोसळून विपरीत घडू शकते.