एमडी विकणारा गजाआड

By Admin | Updated: February 26, 2015 05:58 IST2015-02-26T05:58:45+5:302015-02-26T05:58:45+5:30

अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यात (एनडीपीएस) एमडीचा समावेश झाल्यानंतर आठवड्यात ठाणे पोलिसांनी एमडी पावडरची विक्री

MD sellers | एमडी विकणारा गजाआड

एमडी विकणारा गजाआड

ठाणे : अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यात (एनडीपीएस) एमडीचा समावेश झाल्यानंतर आठवड्यात ठाणे पोलिसांनी एमडी पावडरची विक्री करणाऱ्या सरबतवाल्याला अटक केली आहे. त्याच्याकडे सापडलेल्या मुद्देमालामुळे त्याला २० वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात एमडी पावडर विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला असता त्या वेळी हसन अफसर कुरेशी ऊर्फ हाजी (४०) जाळ्यात अडकला. त्याच्याकडे २७ हजार ५०० रुपये किमतीची ५५ ग्रॅम एमडी पावडर सापडली.
याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी हसनला न्यायालयात हजर केले असतात्याला २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. व्ही. धर्माधिकारी यांनी दिली.
पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस हवालदार भोसले, पोलीस नाईक सोनवणे, पोलीस शिपाई चाबुकस्वार, शिरोसे, राक्षे यांनी कारवाईत सहभाग घेतला
होता. (प्रतिनिधी)

Web Title: MD sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.