एमडी ड्रगवर लवकरच बंदी

By Admin | Updated: January 28, 2015 05:12 IST2015-01-28T05:12:45+5:302015-01-28T05:12:45+5:30

एमडी ड्रगवर बंदी आणण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारला प्रस्ताव धाडला असून त्यावर विचार सुरू असल्याची माहिती मंगळवारी उच्च न्यायालयात देण्यात आली़

MD drugs soon to be banned | एमडी ड्रगवर लवकरच बंदी

एमडी ड्रगवर लवकरच बंदी

मुंबई: एमडी ड्रगवर बंदी आणण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारला प्रस्ताव धाडला असून त्यावर विचार सुरू असल्याची माहिती मंगळवारी उच्च न्यायालयात देण्यात आली़
डॉक्टर युसूफ मर्चंट यांनी यासाठी जनहित याचिका केली आहे़ हेरॉईन मानवी शरीरावर दहा वर्षांत परिणाम करते़ पण एमडी ड्रगने एका वर्षांत हे परिणाम होतात़ अमेरिकेसह ५३ देशांनी यावर बंदी आणली आहे़ मात्र भारतात ते सहज उपलब्ध होते़ याने मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे.

Web Title: MD drugs soon to be banned