मॅकेन्सीच्या अहवालानंतरही तणावमुक्ती कागदावरच!
By Admin | Updated: May 6, 2015 03:51 IST2015-05-06T03:46:21+5:302015-05-06T03:51:33+5:30
२००६ साली मॅकेन्सी या आंतरराष्ट्रीय संस्थेने तणावमुक्ती कशी करावी, यासंदर्भात पोलीस दलाला ‘मोफत’ करून दिलेला अहवाल आजही धूळ खात पडला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

मॅकेन्सीच्या अहवालानंतरही तणावमुक्ती कागदावरच!
तातडीच्या उपाययोजना : वाकोला घटनेनंतर पोलिसांना मानसिकरीत्या कणखर करण्यासाठी पाऊल
मनोज गडनीस/डिप्पी वांकाणी, मुंबई
अपुरी कर्मचारी संख्या, अनियमित ड्युडी यामुळे येणाऱ्या ताणामुळे पोलिसांच्या आत्महत्या किंवा परवा मुंबईत वाकोला पोलीस ठाण्यातील घटना, यामुळे पोलिसांची तणावमुक्ती कायम चर्चेत असते. पण २००६ साली मॅकेन्सी या आंतरराष्ट्रीय संस्थेने तणावमुक्ती कशी करावी, यासंदर्भात पोलीस दलाला ‘मोफत’ करून दिलेला अहवाल आजही धूळ खात पडला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
वाढत्या ताणाच्या पार्श्वभूमीवर २००६ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने मॅकेन्सी या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत एक विस्तृत अहवाल तयार करून घेतला होता. मॅकेन्सीनेही पोलिसांसोबत प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करीत हा अहवाल तयार करून दिला. पोलिसांची कर्तव्ये, पोलीस दलाची गुणवत्ता आणि दर्जा वाढविणे आणि तणावमुक्ती यावर लक्ष केंद्रित केले होते.
---------------------
माझ्याच कार्यकाळात हा अहवाल प्राप्त झाला. पोलिसांना ८ तासांची ड्युटी द्यावी, महिन्यातून किमान तीन साप्ताहिक सुट्या अशा अन्य शिफारशी करण्यात आल्या. कर्मचारी संख्येअभावी आम्ही ८ ऐवजी १० तास ड्युटी तसेच दरबार कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व श्रेणीतील पोलीस अधिकारी एकावेळी कार्यक्रमाला हजर राहून अनेक समस्यांवर चर्चा करीत असत. याचा मोठा फायदा केवळ तणावमुक्तीसाठीच झाला.
-पी.एस.पसरिचा, माजी पोलीस महासंचालक