‘एमसीआयएम’ निवडणुकीची मोर्चेबांधणी
By Admin | Updated: October 9, 2015 01:48 IST2015-10-09T01:48:16+5:302015-10-09T01:48:16+5:30
महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीनची (एमसीआयएम) निवडणूक येत्या मंगळवारी होत असून, राज्यातून ५९ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

‘एमसीआयएम’ निवडणुकीची मोर्चेबांधणी
अमरावती : महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीनची (एमसीआयएम) निवडणूक येत्या मंगळवारी होत असून, राज्यातून ५९ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. ‘निमा’ व ‘व्हीव्हीएम’ यांचे संयुक्त पॅनेल व अपक्ष सदस्यांमध्ये ही लढत होणार आहे. सद्यस्थितीत दोन्ही पॅनेलचे पाच पदाधिकारी बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण १९ पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीतून एमसीआयएमच्या अध्यक्षाची निवड केली जाईल.
दर पाच वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत वैद्यकीय व्यावसायिकांमधून ८, प्राध्यापक संवर्गातून २, प्राचार्य वर्गातून २, गट- २ वर्गातून १ आणि शासनाकडून ५ सदस्य नियुक्त केले जातात.