एमसीएचे बीसीसीआयला पत्र
By Admin | Updated: October 20, 2016 04:15 IST2016-10-20T04:15:09+5:302016-10-20T04:15:09+5:30
मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) लोढा समिती सुधार प्रक्रीया लागू करण्यासंबंधी पावले उचलली असल्याचे सांगितले.

एमसीएचे बीसीसीआयला पत्र
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि त्याच्याशी संलग्न संघटनांमध्ये निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यात येणाऱ्या अडचणींचा अहवाल देताना मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) लोढा समिती सुधार प्रक्रीया लागू करण्यासंबंधी पावले उचलली असल्याचे सांगितले.
त्याचवेळी एमसीएने बीसीसीआयला आश्वासन दिले की, बोर्डाकडून मिळालेली १८.९२ करोडची रक्कम सर्वोच्च न्यायालयकडून येणाऱ्या अंतिम आदेशापर्यंत सुरक्षित ठेवण्यात येईल. संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांच्याद्वारे लिहिण्यात आलेले पत्र बीसीसीआयला दोन दिवसांपुर्वी मिळाले. यामध्ये म्हटले होते की, लोढा समिती शिफारशीद्वारा सुचविण्यात आलेले बदलावांसाठी आमसभेच्या बैठकीत दोन तृतीयांश मते मिळणे आवश्यक आहे.
त्यांनी सांगितले की, ‘जोपर्यंत आमसभेच्या बैठकीत दोन तृतीयांश बहुमताने सहमती पत्र किंवा नियमांतर बदल वा सुधार करण्याचे प्रस्ताव जाहीत होत नाही, या शिफारशी स्वीकारता येणार नाही.’ त्यांती असेही सांगितले की, बोर्ड आपल्याबाजूने निर्णय घेतात आणि त्यानुसार राज्य संघटना कार्यरत राहते. पुर्ण वर्ष स्टेडियमसारख्या स्थायी संपत्तीकडून मिळणारा मोबदला आणि संचालयनाची जबाबदारी संघटनांची असते, बीसीसीआयचे नाही.’ (वृत्तसंस्था)