एमसीए प्रवेश परीक्षा २१ जूनला

By Admin | Updated: May 15, 2015 02:21 IST2015-05-15T02:21:07+5:302015-05-15T02:21:07+5:30

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) एमसीए (मास्टर आॅफ कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता

MCA entrance examination on June 21 | एमसीए प्रवेश परीक्षा २१ जूनला

एमसीए प्रवेश परीक्षा २१ जूनला

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) एमसीए (मास्टर आॅफ कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता २१ जून रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी १८ मे ते ६ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत.
मुंबई विद्यापीठाने सुमारे २० वर्षांपूर्वी एमसीए अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यापाठोपाठ आयडॉलने २00५-२00६मध्ये एमसीए अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा व सहा सेमीस्टरचा आहे. या प्रवेशासाठी २१ जूनला प्रवेश परीक्षा होणार असून, विद्यार्थ्यांना ६६६.े४.ंू.्रल्ल/्रङ्मि’ आणि ६६६.्रङ्मि’.ेंँंङ्मल्ल’्रल्ली.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळांवर १८ मे ते ६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल.
आयडॉलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कमीतकमी शुल्क आकारण्यात येते. तसेच राखीव वर्गातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफी, शिष्यवृत्ती या सुविधा देण्यात येतात. आयडॉलकडून विद्यार्थ्यांना सायंकाळी समुपदेशन व प्रॅक्टिकलसाठी विविध अभ्यास केंद्र उपलब्ध असतात. आयडॉलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी आयटी लॅब आहे. आतापर्यंत आयडॉलमधून सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी एमसीए पदवी संपादन केली आहे. हे विद्यार्थी देशातील आयटी क्षेत्रात आणि परदेशी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

Web Title: MCA entrance examination on June 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.