एमबीबीएसचा पेपर फुटला!
By Admin | Updated: November 29, 2014 01:25 IST2014-11-29T01:25:27+5:302014-11-29T01:25:27+5:30
एमबीबीएसचा तृतीय वर्षातील कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाचा पेपर दुपारी असताना त्यातील उत्तरांचे एसएमएस सकाळीच फिरले.

एमबीबीएसचा पेपर फुटला!
तृतीय वर्ष : परीक्षा दुपारी, प्रश्नांचा एसएमएस फिरला सकाळी
पंकज जैस्वाल - लातूर
एमबीबीएसचा तृतीय वर्षातील कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाचा पेपर दुपारी असताना त्यातील उत्तरांचे एसएमएस सकाळीच फिरले. यातील 3क् गुणांचे प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत उतरल्याने एमबीबीएसचा पेपर फुटल्याची शंका व्यक्त केली जात आह़े शुक्रवारी दुपारी अडीच वाजता एमबीबीएस तृतीय वर्षातील ईएनटी विभागाची परीक्षा होती़ पहिल्या अध्र्या तासात सेक्शन अ अंतर्गत 1क् गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले होत़े एकूण 4क् गुणांची ही परीक्षा होती़ यात सेक्शन ‘ब’ व ‘क’मध्ये विचारलेल्या प्रश्नांचा उल्लेख असणारा एसएमएस शुक्रवारी सकाळी फिरला.
काय होता 3क् गुणांचा एसएमएस?
प्रोबॅबलिटी - ठं2स्रँं18ल्लॅीं’ उं (प्रश्न क्ऱ 2-इ, गुण 4), उंॅ4’ं3्रल्ल स्र1ा्र’ी (प्रश्न क्ऱ 2-ड, गुण 4), ीं1्रल्लॅ अ्र ि(प्रश्न क्ऱ 2-अ, गुण 4), अूू43ी ळल्ल2्र’’्र3्र2 व ळल्ल2्र’ीू3े8 (प्रश्न क्ऱ 4, गुण 7), अरडट (प्रश्न क्ऱ 3, गुण 7), ए’ीू31्रूं’ ’ं18ल्ल7 (प्रश्न क्ऱ 2-ब, गुण 4) असा सुमारे 3क् गुणांचा एसएमएस मोबाईलवर सकाळीच उमटला़
परीक्षा नियंत्रकाकडे संपर्क साधा
यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ अशोक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, परीक्षा विभाग नियंत्रकाकडे याबाबत माहिती घेऊन बोलता येईल़ आपल्याकडे परीक्षा नियंत्रकाचा मोबाइल नंबर नाही़ याबाबत त्यांना प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितल़े
चौकशी केली जाईल
परीक्षेच्या दिवशी दुपारी 1 वाजता आणि नंतर 7 वाजता आढावा घेतला जातो. तसा आजही घेतला. यात आम्हाला काहीच आढळले नाही. तसा प्रकार घडलाच असेल तर चौकशी करून कार्यवाही केली जाईल, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाचे परीक्षा नियंत्रक डॉ. काशिनाथ चव्हाण यांनी दिली.