एमबीएची प्रवेश प्रक्रिया आजपासून
By Admin | Updated: June 24, 2015 02:09 IST2015-06-24T02:09:30+5:302015-06-24T02:09:30+5:30
प्रथम वर्ष एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत(डीटीई) राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेंतर्गत बुधवारपासून

एमबीएची प्रवेश प्रक्रिया आजपासून
पुणे : प्रथम वर्ष एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत(डीटीई) राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेंतर्गत बुधवारपासून प्रवेशाची पहिली फेरी सुरू होत आहे. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत आॅनलाइन पसंतीक्रम अर्ज भरता येणार आहेत.
राज्यात विविध व्यवस्थापन संस्थांमध्ये एमबीएची एकूण प्रवेश क्षमता ४३ हजार ७९५ एवढी आहे. तर एमएमएस, पीजीडीबीएम यांसह अन्य अभ्यासक्रमांच्या जागा सुमारे १४ हजार आहेत. यावर्षी सुमारे ५७ हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना १ जूनपर्यंत नोंदणी आणि अर्ज अंतिम करण्याची मुदत देण्यात आली होती. (प्रतिनिधी)