Mayur Shelke: वांगणीतील चित्तथरारक घटनेचं दुसरं CCTV फुटेज समोर; एक्सप्रेस चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावत गाडी थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 07:13 PM2021-04-27T19:13:22+5:302021-04-27T19:13:52+5:30

Railway pointsman Mayur Shelke for saving life of a child at the Vangani station: हा प्रकार पाहून मयूर शेळके याने क्षणाचाही विलंब न लावता साहिलच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला वाचवलं.

Mayur Shelke: In front of another CCTV footage of the shocking incident in Vangani | Mayur Shelke: वांगणीतील चित्तथरारक घटनेचं दुसरं CCTV फुटेज समोर; एक्सप्रेस चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावत गाडी थांबवली

Mayur Shelke: वांगणीतील चित्तथरारक घटनेचं दुसरं CCTV फुटेज समोर; एक्सप्रेस चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावत गाडी थांबवली

googlenewsNext

बदलापूर : एका अंध मातेचा मुलगा रेल्वे रुळात पडल्यानंतर रेल्वेचा पॉईंट्समन मयूर शेळके याने त्याला वाचवल्याची घटना १७ एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकात घडली होती. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा त्यावेळी समोर आले होते. याच घटनेचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं असून यामध्ये एक्सप्रेसच्या चालकानं इमर्जन्सी ब्रेक लावत गाडी थांबवल्याचे पाहायला मिळत आहे. तर मयूर शेळके यानेही जीवाची बाजी लावत कशा पद्धतीने अंध मातेच्या मुलाला वाचवलं, हे देखील एका दुसऱ्या अँगलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे.

१७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान कर्जततून मुंबईच्या दिशेने जाणारी उद्यान एक्सप्रेस वांगणी रेल्वे स्थानकात येत असताना मयूर शेळके हा प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेला रेल्वे रुळात एक्सप्रेसच्या चालकाला झेंडा दाखवण्यासाठी उभा होता. याच वेळी अंध माता संगीता शिरसाट या त्यांचा मुलगा साहिल शिरसाट याला घेऊन प्लॅटफॉर्मवरून जात होत्या. मात्र त्यांचा अंदाज चुकल्याने त्या प्लॅटफॉर्मच्या कडेला गेल्या आणि त्यांचा मुलगा साहिल हा रेल्वे रुळात पडला.

हा प्रकार पाहून मयूर शेळके याने क्षणाचाही विलंब न लावता साहिलच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला वाचवलं. यानंतर अवघ्या काही क्षणात भरधाव वेगातली उद्यान एक्सप्रेस बाजूने धडधडत निघून गेली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आल्यानंतर मयूर शेळके याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेकांनी त्याचं कौतुक केलं होतं. यानंतर आता याच घटनेचं दुसऱ्या अँगलचं सीसीटीवी फुटेज समोर आलं असून यामध्ये मयूर शेळके यांनी कशा पद्धतीने या अंध मातेच्या मुलाला वाचवलं, हे स्पष्टपणे कैद झालं आहे.

Web Title: Mayur Shelke: In front of another CCTV footage of the shocking incident in Vangani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे