मुंबई मनपात शिवसेनेचाच महापौर निवडून येणार - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: January 2, 2017 14:41 IST2017-01-02T14:33:21+5:302017-01-02T14:41:04+5:30

मुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचाच महापौर निवडून येणार असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच केले आहे.

Mayor of Shiv Sena will be elected in Mumbai Manipat - Uddhav Thackeray | मुंबई मनपात शिवसेनेचाच महापौर निवडून येणार - उद्धव ठाकरे

मुंबई मनपात शिवसेनेचाच महापौर निवडून येणार - उद्धव ठाकरे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 2 - मुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचाच महापौर निवडून येणार असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच केले आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. शिवाय मुंबई महापालिकेचा कारभार स्वच्छ असल्याचेही यावेळी सांगत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी टोमणा हाणला आहे.

मुंबईत पालिकेच्या कामावर काव काव करणारे अनेक कावळे आहेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पालिकेच्या भ्रष्ट कारभाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. दरम्यान यावेळी मुंबई महापालिकेत पाच वर्ष साथ दिल्याबाबत उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे आभारही मानले. शिवाय यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.

 आणखी बातम्या

Web Title: Mayor of Shiv Sena will be elected in Mumbai Manipat - Uddhav Thackeray