महापौर राजीनामा द्या ! शिवसैनिकांचा घंटानाद
By Admin | Updated: June 30, 2016 03:32 IST2016-06-30T03:32:50+5:302016-06-30T03:32:50+5:30
महापौरांची एक वर्षांची कारकिर्द अपयशी ठरल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांनी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढून घंटानाद आंदोलन केले.

महापौर राजीनामा द्या ! शिवसैनिकांचा घंटानाद
विरार : महापौरांची एक वर्षांची कारकिर्द अपयशी ठरल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांनी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढून घंटानाद आंदोलन केले.
९० दिवसात वसई विरारच्या जनतेला मुबलक पाणी देऊ अन्यथा राजीनामा देऊ अशी घोषणा करणाऱ्या महापौर प्रविणा ठाकूर यांनी एक वर्ष पूर्ण झाले तरी पाणी दिले नाही आणि राजीनामा सुध्दा दिला नाही. अनेक अधिकारी भ्रष्टाचारामध्ये रंगेहात सापडूनसुध्दा त्यांच्यावर कारवाई करण्या ऐवजी त्याना संरक्षण देण्याचे काम केले. याची जबाबदारी महापौरांची असून त्या पूर्णपणे अपयशी ठरल्या असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी शिवसेना विरार शहरप्रमुख दिलीप पिंंपळे व उपतालुका प्रमुख अरुण चोरघे यांच्या नेतृत्वाखाली साई बाबा मंदिरापासून मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. एक साल - बुरा हाल, कुंभकर्ण झोपेतून जागे व्हा, महापौर राजीनामा द्या असे फलक शिवसैनिकांनी घेतले होते. हा मोर्चा महापालिकेच्या कार्यालयावर आल्यानंतर तेथे दिलीप पिंपळे व अरुण चोरघे यांनी मार्गदर्शन केले.
उपतालुका प्रमुख संजय राऊत, महिला शहर संघटक ज्योती पवार, उपशहर प्रमुख नरेश वैद्य, राहुल धुरी, आनंद चोरघे, प्रदीप साने, कार्यालय प्रमुख रमाकांत चव्हाण, विभाग प्रमुख मनिष वैद्य, उपविभाग प्रमुख शैलेंद्र घुडे, केयुर वरवटकर, महिला आघाडी श्रद्धा जाधव, शिला लश्करे, नेहा वैद्य, सुनीता चव्हाण यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी यात भाग
घेतला. (वार्ताहर)