महापौरांना नाकारली भाजपाने उमेदवारी
By Admin | Updated: February 4, 2017 02:44 IST2017-02-04T02:44:19+5:302017-02-04T02:44:19+5:30
महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने विद्यमान महापौर उज्ज्वला देशमुख यासोबतच विद्यमान दोन नगरसेवकांनाही उमेदवारी नाकारून मोठा धक्का दिला आहे.
महापौरांना नाकारली भाजपाने उमेदवारी
अकोला : महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने विद्यमान महापौर उज्ज्वला देशमुख यासोबतच विद्यमान दोन नगरसेवकांनाही उमेदवारी नाकारून मोठा धक्का दिला आहे.
बंडखोरी टाळण्याच्या हेतूने सर्वच राजकीय पक्षांनी अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी यादी जाहीर केली नाही. त्या ऐवजी उमेदवाराला थेट ‘एबी’ फार्म देण्याचा मार्ग अवलंबला. भाजपामध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीचा फटका महापौरांना बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.