कोल्हापूरच्या महापौरपदासाठी
By Admin | Updated: November 11, 2015 02:44 IST2015-11-11T02:44:55+5:302015-11-11T02:44:55+5:30
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आघाडीतर्फे अश्विनी रामाणे, तर भाजपातर्फे सविता भालकर यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले.

कोल्हापूरच्या महापौरपदासाठी
रामाणे, भालकर यांचे अर्ज
कोल्हापूर : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आघाडीतर्फे अश्विनी रामाणे, तर भाजपातर्फे सविता भालकर यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांनी अर्ज दाखल केल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.
उपमहापौरपदासाठी शमा मुल्ला (राष्ट्रवादी), संतोष गायकवाड (भाजपा), राजसिंह शेळके (ताराराणी आघाडी) यांनी अर्ज दाखल केले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होत आहे.
विधान परिषद निवडणूक आणि विधानसभेच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसच्या मजबुतीकरणासाठी अश्विनी रामाणे यांचे नाव निश्चित केल्याची बातमी ‘लोकमत’ने दिली होती. (प्रतिनिधी)