शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

निवासी इमारतींवरील वेदरशेडच्या नोटिसा रद्द करून शुल्क आकारू नका - महापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 17:24 IST

मीरा भाईंदर मध्ये ग्रामपंचायत काळा पासून नंतर नगरपरिषद व आताच्या महापालिका काळात अनेक इमारती झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील निवासी इमारतींवर पावसाळी पाण्याची गळती रोखण्यासाठी बसवलेल्या वेदरशेड ना महापालिकेने बजावलेल्या नोटिसा रद्द करून कोणतेही शुल्क न आकारता ३ वर्षांसाठी परवानगी द्या असे आदेश गुरुवारच्या महासभेत महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिले. 

मीरा भाईंदर मध्ये ग्रामपंचायत काळा पासून नंतर नगरपरिषद व आताच्या महापालिका काळात अनेक इमारती झाल्या आहेत. पावसाळ्यात जुन्या झालेल्या इमारतींच्या गच्ची वरून पाणी गळती होऊन इमारत जीर्ण होते. ती लवकर धोकादायक होऊन रहिवाश्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. इमारत पाडल्या नंतर विविध कायदेशीर कारणांनी पुनर्विकास रखडून रहिवाश्यांवर बेघर होण्याची पाळी येते अशी भूमिका विविध स्तरातून मांडली जाते. 

त्यातूनच शहरातील अनेक इमारतींनी वेदरशेड साठी तात्पुरत्या परवानग्या घेऊन गच्चीवर वेदरशेड उभारल्या. परंतु त्या वेदरशेडना परवानगी तात्पुरती असली तरी निवासी इमारतींना मुदती नंतर शेड काढून पुन्हा पावसा आधी लावणे खर्चिक ठरते. जेणे करून एकदा शेड लावली की पुन्हा काढली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. राजकारण्यांनी सुद्धा लोकांच्या गरजेचा राजकीय फायदा घेण्याची संधी सोडली नाही. दुसरीकडे वेदरशेड बाबत तक्रार सुद्धा होऊ लागली. 

दरम्यान पालिकेने वेदरशेड बाबत नोटिसा बजावल्या. त्यात शेडची परवानगी आहे का ? पालिकेचे शुल्क भरले आहे का ? तसेच इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट बाबत माहिती मागवली होती. पुढील वर्षी असलेल्या पालिका निवडणुका आणि निवासी इमारतींना सरसकट पालिकेच्या नोटिसा गेल्याने लोकां मध्ये नाराजी उसळली. त्यामुळे राजकीय पक्षात सुद्धा खळबळ उडाली. 

त्याचे पडसाद गुरुवारच्या महासभेत लक्षवेधी सुचने द्वारे दिसून आले. नगरसेवकांनी वेदरशेड बाबत प्रशासनाने बजावलेल्या नोटिसा विरुद्ध आक्षेप घेत त्यास विरोध केला. अनेक नगरसेवकांनी वेदरशेडची गरज व नागरिकांचे हित असल्याचे मुद्दे मांडले. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी प्रशासनास आदेश देत वेदरशेडच्या नोटीस रद्द करा, शेडना ३ वर्षसाठी परवानगी द्या आणि त्याचे शुल्क घेऊ नका असे सांगितले. परंतु कायदेशीर बाबी व शुल्काशी संबंधित हा विषय असल्याने महापौरांचे आदेश नियमात बसतील की सवंग प्रसिद्धीसाठी ठरतील ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर प्रशासनाने अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक