मुंबईत युतीचाच महापौर : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 22:17 IST2017-02-27T22:17:25+5:302017-02-27T22:17:25+5:30

राज्यातील सरकारला कुठलाही धोका नसून मुंबईत युतीचाच महापौर होईल

Mayor of the Alliance in Mumbai: Chandrakant Patil | मुंबईत युतीचाच महापौर : चंद्रकांत पाटील

मुंबईत युतीचाच महापौर : चंद्रकांत पाटील


नाशिक : भाजपा, शिवसेना यांची नैसर्गिक मैत्री आहे. निवडणूकपुर्व झालेल्या किरकोळ भांडणामुळे या मैत्रीला व राज्यातील सरकारला कुठलाही धोका नसून मुंबईत युतीचाच महापौर होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक बांधकाम भवन येथे आढावा बैठकीसाठी पाटील नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कोणीही आपल्या मनातील मांडे तोडू नये, शिवसेना व भाजपाच्या नेत्यांनी पारंपरिक युतीच्या दिशेने वाटचाल करून मैत्रीचे नाते टिकवावे. कुठल्याही प्रकारची अमंगल युती मुंबईत होणार नाही असेहीत त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: Mayor of the Alliance in Mumbai: Chandrakant Patil