लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूरच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका माया इवनाते यांचा दिल्लीत जाण्याचा एक योग हुकला पण राज्यसभेच्या निमित्ताने दुसरा योग मात्र जुळून आला. इवनाते या आदिवासी समाजाच्या आहेत. त्या यापूर्वी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य राहिल्या आहेत. सदस्य म्हणून त्यांनी चांगले काम केल्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना या आयोगाचे अध्यक्षपद देण्याचे ठरविले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्र सरकारला तशी गळ घातली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन महिन्यांपूर्वी त्यासाठी तोंडी होकारही दिला होता असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. मात्र, काही कारणांनी इवनाते यांची नियुक्ती रखडली. त्यातच महापालिकेची निवडणूक आली आणि इवनाते यांना भाजपने नागपुरात उमेदवारी दिली व त्या मोठ्या फरकाने जिंकल्यादेखील. तथापि, दोन आठवड्यापूर्वी राज्यसभेचे भाजपचे उमेदवार निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि जी २५ नावे प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीने केंद्रीय भाजपकडे पाठविली त्यात माया इवनाते यांचेही नाव पाठविण्यात आले.आयोगाच्या अध्यक्ष म्हणून दिल्लीला जाण्याची संधी इवनाते यांना मिळणार असे चित्र असताना त्या राज्यसभेच्या गाडीत बसल्या.
Web Summary : Maya Ivnate, previously considered for a commission head role, became a Rajya Sabha MP. Despite nearly securing the commission position with central support, she was elected as a corporator and then nominated to the Rajya Sabha, marking a surprising turn of events.
Web Summary : माया इवनाते, जो पहले आयोग अध्यक्ष पद के लिए विचारधीन थीं, अब राज्यसभा सांसद बनीं। केंद्रीय समर्थन के साथ आयोग पद लगभग सुरक्षित करने के बावजूद, वह एक कॉर्पोरेटर चुनी गईं और फिर राज्यसभा के लिए नामांकित हुईं, जो घटनाओं का एक आश्चर्यजनक मोड़ है।