मे महिन्यात निवडणुकीची शक्यता

By Admin | Updated: April 4, 2017 03:31 IST2017-04-04T03:31:34+5:302017-04-04T03:31:34+5:30

पनवेल महापालिकेची पहिली निवडणूक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

May the possibility of elections in May | मे महिन्यात निवडणुकीची शक्यता

मे महिन्यात निवडणुकीची शक्यता

मयूर तांबडे,
पनवेल- पनवेल महापालिकेची पहिली निवडणूक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एप्रिल-मे महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्याने पालक सुटीत गावी जाण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे मे महिन्यात निवडणुका जाहीर झाल्या तर त्याचा परिणाम मतदानावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पनवेल महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग लवकरच घोषित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर हा परिसर कॉस्मोपॉलिटन परिसर म्हणून ओळखला जात असून देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक याठिकाणी मोठ्या संख्येने राहतात. शाळांना सुटी लागल्यावर मतदानाकडे पाठ फिरवून मतदार मूळ गावी गेल्यास त्याचा फटका उमेदवारांना बसू शकतो.
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा मे महिन्यात झाली तर मतदान कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदान कमी झाल्याचा फटका सर्वच पक्षांना बसणार आहे. त्यामुळे सारेच पक्ष महापालिकेच्या निवडणुका जून महिन्यात घेण्यासाठी आग्रही आहेत. मे महिन्यात महापालिकेच्या निवडणुका झाल्यास भाजपा, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यासह भारिप, आरपीआय या पक्षांची दमछाक होणार आहे. मतदारांना गावावरून मतदानासाठी आणण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.
पनवेलमध्ये राजकीय पक्षांची लगबग; सुटीमुळे मतदानावर परिणाम होण्याची भीती
महापालिका निवडणुकीसाठी बनविण्यात आलेल्या चार लाख मतदारांच्या यादीत जवळपास दोन लाख मतदारांच्या नावांचा घोळ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मतदार याद्या नव्याने बनवून त्या प्रसिध्द कराव्या लागणार आहेत.
>पनवेल महापालिकेच्या निवडणुका साधारणत: २0 मेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. मतदार याद्या दुरु स्तीचे काम सध्या सुरू आहे.
- राजेंद्र निंबाळकर,
आयुक्त, पनवेल महापालिका

Web Title: May the possibility of elections in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.