शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

विचार, वाणी आणि व्यवहारातही हिंसा नको - रामनाथ कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 18:27 IST

हिंसा केवळ हाताने होते असे नाही तर विचार, वाणीमधूनही होऊ शकते त्यामुळे आपण आपले विचार भगवान ऋषभदेव यांच्या मांगीतुंगीवरील विशाल मूर्तीप्रमाणे बनवून अहिंसा धर्माचे निष्ठने पालन करावे.

- अझहर शेख

नाशिक : (ऋषभदेव नगरीतून) -  हिंसा केवळ हाताने होते असे नाही तर विचार, वाणीमधूनही होऊ शकते त्यामुळे आपण आपले विचार भगवान ऋषभदेव यांच्या मांगीतुंगीवरील विशाल मूर्तीप्रमाणे बनवून अहिंसा धर्माचे निष्ठने पालन करावे आणि निसर्गसंवर्धनाचा पुरेपूर प्रयत्न करावा असे प्रतिपादन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी पर्वताच्या पायथ्याशी आर्यिका ज्ञानमती माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान ऋषभदेव 108 फूट मूर्ती निर्माण कमिटी आयोजित विश्वशांती अहिंसा आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उदघाटक म्हणून रामनाथ कोविंद बोलत होते.

ऋषभदेवपूरम येथे झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे होते. व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद यांच्यासह गणिनी प्रमुख श्री ज्ञानमती माताजी, आर्यिकारत्न चंदनामती माताजी उपस्थित होते. यावेळी मूर्ती निर्माण कमिटीतर्फे भगवान ऋषभदेव आंतरराष्ट्रीय पुरस्कार मुरदाबाद येथील तीर्थांकर महावीर विश्व विद्यापीठचे कुलधिपती सुरेश जैन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. रुपये 11 लाख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याचवेळी कमितीतर्फे तयार करण्यात आलेल्या 'सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा' या ग्रंथाचे भगवान ऋषभ देव सर्वोच्च प्रतिमा ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. पहिली प्रत राष्ट्रपती रामनाथ कोविंद याना भेट देण्यात आली.

ऋषभदेवपूरम मांगीतुंगी येथे श्री दिगंबर जैन समाजाच्या वतीने आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद व त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांचे भगवान ऋषभदेव यांची प्रतिकृती भेट देऊन रवींद्रकिर्ती स्वामी यांनी स्वागत केले. दरम्यान, केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री व सोहळ्याचे अध्यक्ष  डॉ. सुभाष भामरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, विश्वशांतीसाठी जैन धर्माच्या अहिंसाच्या सिद्धांताची गरज आहे. अहिंसाची सुटसुटीत व्याख्या जैन धर्माने केली आहे. विश्वाला अहिंसाची गरज आहे. विश्वात शांतता प्रस्थापित करण्याअगोदर आपल्या घरात आपल्याला शांती निर्माण करावी लागेल. हंकार हा विवादाचा मूळ कारण आहे. हे मूर्ती भारतीय संस्कृती साठी मोठी भेट आहे. हे समाजासाठी वरदान आहे. आदिवासी भागात या माध्यमातून परिसरात विकासगांग आणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे जातीने लक्ष द्यावे, असे डॉ. सुभाष भामरे म्हणाले. तर, मांगीतुंगी क्षेत्रात सगळे मंजूर विकासकामे पूर्णत्वास येणार. विश्व शांती भवन निर्मितीचा मार्गही लवकरच मोकळा होईल, तसेच राज्यातील 180 तालुक्यात दुष्काळ लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक