मॅक्सवेलची आतषबाजी

By Admin | Updated: May 8, 2014 00:48 IST2014-05-08T00:48:02+5:302014-05-08T00:48:02+5:30

किंग्ज इलेव्हन पंजाबने २३१ धावांचा डोंगर उभारल्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या अप्रतीम कामगिरीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्सचा बुधवारी ४४ धावांनी पराभव केला.

Maxwell's fireworks | मॅक्सवेलची आतषबाजी

मॅक्सवेलची आतषबाजी

आयपीएल : पंजाबकडून चेन्नई दुसर्‍यांदा पराभूत

 कटक : ग्लेन मॅक्सवेलची धडाकेबाज फलंदाजी आणि डेव्हिड मिलरसोबतच्या त्याच्या शतकी भागीदारीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने २३१ धावांचा डोंगर उभारल्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या अप्रतीम कामगिरीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्सचा बुधवारी ४४ धावांनी पराभव केला. पंजाबच्या ४ बाद २३१ धावांचा पाठलाग करणार्‍या चेन्नईचा डाव २० षटकांत ६ बाद १८७ धावांत थांबला. पंजाबचा चेन्नईवर हा दुसरा विजय होता. पंजाबने चेन्नईचा सलग सहा विजयांचा रथ खंडित करीत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. मॅक्सवेलने केवळ ३८ चेंडूंवर आठ षटकार आणि सहा चौकारांसह ९० धावा ठोकल्या. यंदाच्या पर्वात तो दुसर्‍यांदा शतकापासून वंचित राहीला. याच संघाविरुद्ध सलामीच्या सामन्यात त्याने यूएईत ९५ धावा झळकवल्या होत्या. मिलरने ४७ धावा केल्या. दोन बाद ३८ अशा स्थितीतून संघाला बाहेर काढताना या दोघांनी १०.४ षटकांत तिसर्‍या गड्यासाठी १३५ धावांची भागीदारीही केली. कर्णधार जॉर्ज बेली याने अखेरच्या १६ चेंडूंवर मिशेल जॉन्सनसोबत पाचव्या गड्यासाठी नाबाद ४९ धावा वसूल केल्या. बेली अवघ्या १३ चेंडूंचा सामना करीत सहा चौकार व दोन षटकारांसह ४० धावांवर तर जॉन्सन ११ धावांवर नाबाद राहीला. आयपीएलमध्ये पंजाबची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी २०११ साली धर्मशाळा येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुविरुद्ध दोन गड्यांच्या मोबदल्यात पंजाबने २३२ धावा केल्या होत्या. नाणेफेक जिंकल्यानंतरही पंजाबसाठी ३० धावा करीत सेहवागने शानदार सुरुवात केली. दुसरा सलामीवीर मनदीपसिंग मात्र केवळ तीन धावा काढून परतला. पाठोपाठ सेहवाग बाद होताच २ बाद ३८ अशी स्थिती होती पण मॅक्सवेल- मिलर यांनी चेन्नईचा मारा फोडून काढला. या दोघांनी अश्विनला टार्गेट केले होते. (वृत्तसंस्था)

किंग्ज इलेव्हन पंजाब : वीरेंद्र सेहवाग त्रि. गो. हिल्फेन्हास ३०,मनदीपसिंग झे. पांडे गो. मोहित ३, ग्लेन मॅक्सवेल झे. जडेजा गो. मोहित ९०, डेव्हिड मिलर त्रि. गो. मोहित ४७, जॉर्ज बेली नाबाद ४०, मिशेल जॉन्सन नाबाद ११, अवांतर:१०, एकूण:२० षटकांत ४ बाद २३१ धावा. गडी बाद क्रम: १३३/, २/३८, ३/१७३, ४/१८२. गोलंदाजी: हिल्फेन्हास ४-०-३६-१, पांडे ४-०-४१-१, मोहित ४-०-३८-२, स्मिथ ३-०-३६-१, जडेजा ३-०-३७-०, अश्विन २-०-३८-०.

चेन्नई सुपरकिंग्स : ड्वेन स्मिथ झे.जॉन्सन गो.संदीप ४, ब्रेंडन र्मॅक्यूलम धावबाद ३३, सुरेश रैना झे. मिलर गो.मॅक्सवेल ३५, रवींद्र जडेजा त्रि. गो. धवन १७, फाफ डुप्लेसिस झे. कार्तिक गो. जॉन्सन ५२, महेंद्रसिंग धोनी झे, बेली गो. जॉन्सन २३, मिथून मन्हास नाबाद ८, आर, अश्विन नाबाद ११, अवांतर: ४, एकूण: २० षटकांत ६ बाद १८७ धावा. गडी बाद क्रम: १/५, २/५६, ३/८८, ४/९८, ५/१५९, ६/१६७. गोलंदाजी: संदीप शर्मा ४-०-३७-१, मिशेल जॉन्सन ४-०-३७-२, मुरली कार्तिक ४-०-४०-०, अक्षर पटेल ४-०-२८-०, ग्लेन मॅक्सवेल २-०-२१-१, रिषी धवन २-०-२३-१.

Web Title: Maxwell's fireworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.