शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मविआला कर्नाटकी बूस्टर; कर्नाटकच्या काँग्रेसी कशिद्याने भाजपवर चिंतनाची वेळ; काँग्रेसचे मनोधैर्य वाढले

By यदू जोशी | Updated: May 14, 2023 06:25 IST

राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नंतर नागपुरातील वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजप-शिंदे युती बॅकफूटवर जात असतानाच मविआतील तीन पक्षांमधले मतभेद उफाळून आले. 

 

मुंबई : कर्नाटकमधील काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला मोठे बळ मिळाले आहे. आपसातील मतभेद दूर सारून या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र राहिले तर, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजप-शिंदे युतीसमोर मोठे आव्हान उभे राहील, असे मानले जात आहे. 

राष्ट्रवादी, काँग्रेसशिवसेना या तीन पक्षांच्या छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नंतर नागपुरातील वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजप-शिंदे युती बॅकफूटवर जात असतानाच मविआतील तीन पक्षांमधले मतभेद उफाळून आले. 

एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याचे नाट्य घडले. त्यावरूनही राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांनी एकमेकांवर काही आरोप केले. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी ठाकरे यांचे विश्वासू खा. संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले. मात्र, आता कर्नाटकच्या निकालानंतर मविआचे मनोबळ वाढेल व आपसातील वाद कमी करून भाजपविरोधात ठामपणे उभे राहण्याचा नेत्यांवरही दबाव येईल, असे म्हटले जाते.

कर्नाटकातील पराभवामुळे राज्यातील भाजपवरही चिंतनाची वेळ आणली आहे. लोकसभा निवडणुकीत किमान ४२ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निर्धारित केले आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) हे वेगवेगळे लढले होते. मात्र, त्यांच्या मतविभाजनाचा फायदा भाजपला उचलता आला नाही. महाराष्ट्रात भाजपविरोधात तीन प्रमुख पक्षांची वज्रमूठ आजतरी कायम आहे. त्यात काही फूट पडू शकेल का, यावर भाजप लक्ष केंद्रित करेल, असा अंदाज आहे. 

सरकारची कामगिरी उंचवावी लागेल आघाडीत बिघाडी होऊ नये, याची काळजी मविआला घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारचे अपयश हिंदुत्वाचा मुद्दा समोर करून झाकण्याचा प्रयत्न कर्नाटकात भाजपने केला. पण, त्यात यश आले नाही. महाराष्ट्रातही तसे करता येणार नाही; सरकारची कामगिरी उंचवावी लागेल, असा संदेशही या निकालाने भाजपला दिला आहे. 

भाजप-सेना युतीवर हल्ले तीव्र होतीलभाजपची कोंडी करण्याची संधीही या निकालाने मविआच्या नेत्यांना मिळवून दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजप-शिवसेना युतीवर विरोधकांचे हल्ले अधिक तीव्र होतील, असे मानले जात आहे. त्यासाठी या युतीला तयार राहावे लागणार आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस