विधानपरिषदेच्या पाचपैकी तीन जागी ‘मविआ’ची सरशी, नागपुरात भाजपला, कोकणात मविआला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 07:36 AM2023-02-03T07:36:21+5:302023-02-03T07:38:15+5:30

Vidhan Parishad Election: राज्यातील विधानपरिषदेच्या तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत धक्कादायक निकाल पुढे आले आहेत.

'Mavia' wins three out of five Legislative Council seats, shock to BJP in Nagpur, shock to Mavia in Konkan | विधानपरिषदेच्या पाचपैकी तीन जागी ‘मविआ’ची सरशी, नागपुरात भाजपला, कोकणात मविआला धक्का

विधानपरिषदेच्या पाचपैकी तीन जागी ‘मविआ’ची सरशी, नागपुरात भाजपला, कोकणात मविआला धक्का

googlenewsNext

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत धक्कादायक निकाल पुढे आले आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघात समर्थित उमेदवाराच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, औरंगाबादेत राष्ट्रवादीने  आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले. 
कोकण शिक्षकची जागा भाजपने खेचून आणली.  अमरावती पदवीधरमध्ये भाजप पिछाडीवर आहे. डाॅ. रणजित पाटील यांच्या रद्द झालेल्या मतांची फेरमाेजणी रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. 

पाचव्या फेरीनंतर सत्यजीत तांबे विजयी
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीच्या पाचव्या फेरीनंतर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे ६८,९९९ मतांसह विजयी झाले. मविआ पुरस्कृत शुभांगी पाटील यांना ३९,५३४ मते मिळाली. सत्यजीत तांबे यांचा तब्बल २९,४६५ इतक्या मताधिक्याने विजय झाला. या निवडणुकीत नाट्यमय राजकीय घडामाेडी घडल्या. 

नागपूर : मविआ समर्थित अडबाले विजयी 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडात भाजपसमर्थित उमेदवार नागो गाणार यांना महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी एकतर्फी मात दिली. अडबाले यांनी पहिल्या पसंतीची १६,७०० मते घेत विजयाचा कोटा पूर्ण केला. गाणार यांना ८,२११ मते मिळाली. शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे ३,३५८ मते घेत तिसऱ्या स्थानी राहिले.

अंतिम फेरीअखेर काळे विजयी
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे हे अंतिम फेरीअखेर 
६,९३४ मतांनी विजयी झाले. 
काळे यांना २३,५५७ मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावरील भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना १६,६६३ मते मिळाली.  
मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव १४,१२८ मतांसह तिसऱ्या स्थानावर होते. रात्री उशिरा निकाल जाहीर झाला.

दृष्टिक्षेपात पदवीधर/शिक्षक मतदारसंघ निकाल
मतदारसंघ        भाजप+शिवसेना (बा.)/समर्थित     मविआ/समर्थित    अपक्ष    विजयी
कोकण शिक्षक        ज्ञानेश्वर म्हात्रे (२०,०८३)    बाळाराम पाटील (१०,९९७)    धनाजी पाटील (१,४९०)     ज्ञानेश्वर म्हात्रे
नागपूर शिक्षक        नागो गाणार (८,२११)    सुधाकर अडबाले (१६,७००)    राजेंद्र झाडे (३,३५८)    सुधाकर अडबाले
मराठवाडा शिक्षक        किरण पाटील (१६,६६३)    विक्रम काळे (२३,५५७)    सूर्यकांत विश्वासराव (१४,१२८)    विक्रम काळे
अमरावती पदवीधर         डॉ. रणजित पाटील (४१,०२७)    धीरज लिंगाडे (४३,३४०)    अनिल अमळकर (४,१८१)    लिंगाडे (आघाडीवर)
नाशिक पदवीधर (सर्व अपक्ष)     सत्यजीत तांबे (६८,९९९)    शुभांगी पाटील (३९,५३४)    रतन बनसोडे (१,७१३)    सत्यजीत तांबे 

Web Title: 'Mavia' wins three out of five Legislative Council seats, shock to BJP in Nagpur, shock to Mavia in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.