शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे मविआ खासदारांची पाठ, अमोल कोल्हेंच्या हजेरीने तर्कवितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 09:02 IST

Maharashtra Politics: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीकडे महाविकास आघाडीतील खासदारांनी पाठ फिरवली. मात्र याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे अपवाद ठरले. 

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीकडे महाविकास आघाडीतील खासदारांनी पाठ फिरवली. मात्र याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे अपवाद ठरले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री भागवत कराड, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्यातील खासदार, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीनही पक्षांचे खासदार गैरहजर होते. मात्र राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी  उपस्थित राहून भूमिका मांडली.

केंद्र सरकारकडे राज्याचे प्रलंबित असलेले प्रस्ताव आणि प्रश्न याचा संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात खासदारांनी पाठपुरावा करावा यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी अशा पद्धतीची सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलवण्याची प्रथा आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवारपासून सुरू होत असून मुख्यमंत्र्यांनी खासदारांची बैठक एक दिवस आधी बोलावल्याने महाविकास आघाडीच्या खासदारांमध्ये नाराजी होती. त्यातच महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटातील तणावपूर्ण संबंध पाहता या बैठकीला न जाण्याची भूमिका महाविकास आघाडीने घेऊन अप्रत्यक्ष या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र कोल्हे यांच्या उपस्थितीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे