माउलींचा सोहळा फलटण नगरीत

By Admin | Updated: July 8, 2016 01:33 IST2016-07-08T01:33:27+5:302016-07-08T01:33:27+5:30

ध्यानी मनी विठ्ठलाची आस धरीत पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा लाखो वार महानुभव पंथाची दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या ऐतिहासिक फलटण नगरीत विसावला.

Mauli's Function in Phaltan City | माउलींचा सोहळा फलटण नगरीत

माउलींचा सोहळा फलटण नगरीत

फलटण : ध्यानी मनी विठ्ठलाची आस धरीत पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा लाखो वार महानुभव पंथाची दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या ऐतिहासिक फलटण नगरीत विसावला. माउलींचा पालखी सोहळा शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरडकडे प्रस्थान करणार आहे.
संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी बुधवारी तरडगाव येथे मुक्कामी होती. गुरुवारी पहाटे माउलींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. कर्णेकऱ्याने तिसरा कर्णा वाजविला आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठलऽऽ’चा एकच जयघोष झाला. त्यानंतर पालखीने तरडगाव सोडले आणि भक्तीचा जागर करीत वैष्णवांचा महासागर पंढरीच्या रस्त्याने निघाला. माउलीला निरोप देण्यासाठी तरडगावकर गावाच्या वेशीपर्यंत आले होते. माउलींचा गजर करीत सोहळा काळजच्या दत्त मंदिरात विसावला. त्यावेळी ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सुरवडी येथे विसावा घेऊन पालखी दुपारच्या नैवेद्यासाठी निंभोरे येथे थांबली. त्यानंतर सोहळा सायंकाळी पाचला फलटणच्या वेशीवर आला. (वार्ताहर)

बेलवाडीत अश्वरिंगण सोहळा!
बारामती : सणसर येथील मुक्कामानंतर तुकोबारायांचा पालखी सोहळा पहिल्या अश्वरिंगणासाठी बेलवाडी येथे विसावला. सकाळी ७पासूनच रिंगणस्थळावर भाविकांनी गर्दी केली होती. अश्वरिंगण सोहळ्याची सुरुवात शहाजी मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली. यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावनधारक महिला, झेंडेकऱ्यांचे रिंगण पार पडले. या वेळी विठूनामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना सर्वच जण वयोभान विसरले होते. वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्यादरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले.

Web Title: Mauli's Function in Phaltan City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.