संदेशने माथेरानचे नाव पोहोचविले सातासमुद्रापार

By Admin | Updated: November 2, 2014 01:09 IST2014-11-02T01:09:54+5:302014-11-02T01:09:54+5:30

सर्वोत्तम घोडेस्वारीच्या कलेने देशविदेशातील घोडय़ांच्या रेसेस जिंकून माथेरानचे नाव सातासमुद्रापार नेणा:या 22वर्षीय जॉकी संदेश आखाडे याच्यावर माथेरानकरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

Matheran's name reached with the message Satasamprayada | संदेशने माथेरानचे नाव पोहोचविले सातासमुद्रापार

संदेशने माथेरानचे नाव पोहोचविले सातासमुद्रापार

देशविदेशात अनेक रेसेस जिंकल्या : तरुण घोडेस्वारावर अभिनंदनाचा वर्षाव
मुकुंद रांजणो - माथेरान
सर्वोत्तम घोडेस्वारीच्या कलेने देशविदेशातील घोडय़ांच्या रेसेस जिंकून माथेरानचे नाव सातासमुद्रापार नेणा:या 22वर्षीय जॉकी संदेश आखाडे याच्यावर माथेरानकरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
2क्क्8मध्ये रेसच्या घोडय़ाचे मालक इकबाल हे माथेरानमध्ये फिरावयास आले होते. त्यांना संदेशची उत्तम घोडेस्वारी भावली आणि त्याला जॉकी बनविण्याच्या उद्देशाने त्याचे वडील तुकाराम आखाडे यांना त्यांनी विनंती केली. मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या हेतूने त्यांनी होकार दिला. घोडा ट्रेनर रेहनुल्ला खान हे संदेशची घोडेस्वारी पाहून अवाक् झाले. ताबडतोब त्याच्या रेसिंग लायसन्सची व्यवस्थाही करण्यात आली. मागील पाच वर्षात संदेशने एकूण 413 रेस जिंकल्या आहेत. यामध्ये नऊ क्लासिक रेस तसेच 35हून अधिक ग्रुप रेस जिंकल्या. भारतात मुंबई, पुणो, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता या ठिकाणी तसेच गेल्या आठवडय़ात म्हैसूर येथे डर्बी रेस जिंकली आहे. पुण्यामध्ये एकूण 4क् रेसेसच्या विजयाची नोंद घेऊन चॅम्पियनशिप मिळविली. याचे o्रेयदेखील संदेश त्याचे मालक इकबाल नथनी यांना देत आहे.
या युवकाने इंग्लंड, मॉरिशसमध्येही आपल्या घोडेस्वारीचे कसब दाखविले आहे. या महिन्यात त्याला मकाऊ या देशात घोडेस्वारीकरिता निमंत्रण आले आहे.  त्याची विजयी घोडदौड सुरू आहे. त्याला या यशाबद्दल विचारले असता याचे हक्कदार वडील तुकाराम आखाडे असल्याचे तो सांगतो.

 

Web Title: Matheran's name reached with the message Satasamprayada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.