शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

Matheran: पर्यटकांची लाडकी माथेरानची मिनी ट्रेन झाली अवघी ११६ वर्षांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 12:03 IST

Matheran: मुंबईमधील पारसी व्यापारी आदमजी पीरभोय यांनी १९०७ मध्ये नेरळ येथून माथेरानला जाण्यासाठी नॅरोगेज ट्रॅक बनवून मिनी ट्रेन सुरू केली तो दिवस होता १५ एप्रिलचा.

- विजय मांडेकर्जत : मुंबईमधील पारसी व्यापारी आदमजी पीरभोय यांनी १९०७ मध्ये नेरळ येथून माथेरानला जाण्यासाठी नॅरोगेज ट्रॅक बनवून मिनी ट्रेन सुरू केली तो दिवस होता १५ एप्रिलचा. नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर चालविल्या गेलेल्या पहिल्या मिनी ट्रेनला आता ११६ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, त्या काळात मिनी ट्रेनने अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत.

 १९७२ मध्ये तीन वर्षे चाललेल्या रेल्वे संपात ही ट्रेन बंद होती. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी माथेरान -नेरळ घाट रस्ता श्रमदान करून तयार केला आणि आज हाच एकमेव रस्ता माथेरान घाट रस्ता म्हणून ओळखला जातो. तसेच अलीकडे अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्ग वाहून गेला होता. 

    १८५७ मध्ये ठाण्याचे कलेक्टर ह्यूज मेलेट यांनी शोध लावल्यावर रामबागमार्गे माथेरानमध्ये ब्रिटिश अधिकारी येऊ लागले.     थंडहवेचे ठिकाण म्हणून शोधलेल्या या ठिकाणी नंतरच्या काळात सरकारी कार्यालये सुरू झाली.    १९०५ मध्ये माथेरान गिरीस्थान नगरपालिका, पोस्ट ऑफिस, टेलिग्राम केंद्र ही ब्रिटिशांची देणं होत. त्याकाळी मुंबईहून पनवेल, उलवे, चौक असे पुढे रामबागमार्गे चालत आणि घोड्यावर किंवा डोलीत बसून माथेरानला ब्रिटिश अधिकारी आणि मुंबईमधील धनिक समजले जाणारे पारसी लोक यायचे. 

मिनी ट्रेनची देणगी कोणाची?१९०० च्या दरम्यान मुंबईचे नगरपाल असलेले सर आदमजी पीरभोय आणि त्यांचा मुलगा हुसेन अब्दुल पीरभोय हे माथेरानला जाण्यासाठी नेरळला आले असता अंधार झाला होता आणि त्यामुळे त्यांना माथेरानला जाण्यासाठी डोली उपलब्ध झाली नाही. तेव्हा पीरभोय पिता-पुत्रांनी माथेरान येथे जाईन तर ट्रेन घेऊनच जाईन, असा निर्णय घेतला आणि पीरभोय पिता-पुत्रांनी नेरळ ते माथेरान या अत्यंत अवघड घाटातून रेल्वे नेण्यासाठी १९०१ मध्ये सुरुवात केली आणि १५ एप्रिल १९०७ रोजी नेरळ-माथेरान या २१ किलोमीटर नॅरोगेज मार्गांवर मिनी ट्रेनची सेवा सुरू झाली. या कामाकरिता त्यांनी १६ लाख रुपये स्वतः खर्च केले होते.

स्थित्यंतरे काय झाली...    वाफेच्या इंजिनवर चालणारी मिनीट्रेन डिझेलवर चालविली जाते     पूर्वी मिनीट्रेनच्या प्रवासात दोन बोगीमध्ये ब्रेक पोर्टर असायचे. आज एअर ब्रेक सेवा सुरू झाली      आता वातानुकूलित सेवादेखील मिनी ट्रेनमध्ये आहे.      मिनी ट्रेन जागतिक वारसा म्हणून नामांकन मिळविण्यासाठी सज्ज आहे.

घोडा किंवा डोलीत बसून प्रवास १८५४ मध्ये मुंबई-पुणे या मार्गावर रेल्वे सुरू झाली आणि १८५६ ला ती ट्रेन नेरळ, खोपोलीपर्यंत पोहोचली. त्यामुळे नेरळ येथे रेल्वे ट्रेन असल्याने नेरळहून माथेरान असा प्रवास सुरू झाला होता. घोडा किंवा डोलीत बसून माथेरानला जाण्याचा मार्ग १८५७ मध्ये विकसित झाला होता.

टॅग्स :Matheranमाथेरानrailwayरेल्वे