गुढीपाडव्याला सुट्टी न दिल्याने माथाडी कामगाराची आत्महत्या
By Admin | Updated: March 28, 2017 23:52 IST2017-03-28T23:52:24+5:302017-03-28T23:52:24+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमीतीच्या विस्तारीत भाजी मार्केटमध्ये मंगळवारी मध्यरात्री गणेश कोंडीबा वाडकर या माथाडी कामगाराने गळफास घेवून आत्महत्या

गुढीपाडव्याला सुट्टी न दिल्याने माथाडी कामगाराची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 28 - मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमीतीच्या विस्तारीत भाजी मार्केटमध्ये मंगळवारी मध्यरात्री गणेश कोंडीबा वाडकर या माथाडी कामगाराने गळफास घेवून आत्महत्या केली. गुढीपाडव्याला गावी जाण्यासाठी सुट्टी न दिल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलीस व मार्केटमधील सुत्रांनी दिली.
आत्महत्या केलेला माथाडी कामगार गणेश वाडकर ( वय 19 )सातारा जिल्ह्यातील वाईजवळील केंजळ गावचा रहिवाशी आहे. विस्तारीत भाजी मार्केटमध्ये हमालीचे काम करत असून येथील गाळा नंबर व्ही 952 मध्ये राहात होता. गुढीपाडव्याला त्याला गावी जाण्यासाठी सुट्टी हवी होती, पण मिळाली नाही यामुळे तो निराश झाला होता.. सोमवारी मार्केटमधील इतर कामगार झोपल्यानंतर त्याने भाजीपाला पॅकिंग करणा-या रस्सीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. मध्यरात्रीनंतर सुरक्षा कर्मचा-यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसांना कळवून त्या तरूणाला महानगरपालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रूग्णालयात दाखल केले, पण त्यापुर्वी त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एपीएमसी पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.