गडचिरोलीमध्ये अल्पवयीन मुलीवर मांत्रिकाचा बलात्कार
By Admin | Updated: January 25, 2015 01:40 IST2015-01-25T01:40:21+5:302015-01-25T01:40:21+5:30
उपचारास आलेल्या अल्पवयीन मुलीवर मांत्रिकाने बलात्कार केल्याची घटना सोनसरी येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली.

गडचिरोलीमध्ये अल्पवयीन मुलीवर मांत्रिकाचा बलात्कार
कुरखेडा (जि़ गडचिरोली) : उपचारास आलेल्या अल्पवयीन मुलीवर मांत्रिकाने बलात्कार केल्याची घटना सोनसरी येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. बाबूराव किल्लारसिंग कुमोटी (४५) असे मांत्रिकाचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे़ ़
२० जानेवारीला मनोरूग्ण मुलीला तिचे आई-वडिल बाबूराव कुमोटीकडे घेऊन गेले. ती इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. मुलीवर उपचाराकरिता तीन हजार रूपयांची मागणी करुन चार ते पाच दिवस सोनसरी येथेच ठेवावे लागेल, असे कुमोटीने तिच्या आई-वडिलांना सांगितले़ त्यावर विश्वास ठेवून त्यांनी तिला बाबूरावकडे ठेवले. मुलीला परत नेण्यासाठी शनिवारी ते सोनसरी येथे आले असता या नराधम मांत्रिकाने तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले़ त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले़ पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बाबूरावविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली़ (प्रतिनिधी)