मुंबई महापालिकेचा पैसा मातोश्रीवर

By Admin | Updated: April 2, 2015 05:06 IST2015-04-02T05:06:11+5:302015-04-02T05:06:11+5:30

मुंबई महापालिकेत गेल्या २२ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या शिवसेनेने शहराच्या विकासाऐवजी जनतेचा पैसा ‘मातोश्री’वर जमा करण्यात धन्यता मानली जाते. म

Mata Ishwar's money for Mumbai Municipal Corporation | मुंबई महापालिकेचा पैसा मातोश्रीवर

मुंबई महापालिकेचा पैसा मातोश्रीवर

मुंबई : मुंबई महापालिकेत गेल्या २२ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या शिवसेनेने शहराच्या विकासाऐवजी जनतेचा पैसा ‘मातोश्री’वर जमा करण्यात धन्यता मानली जाते. महौपारांच्या स्टिंग आॅपरेशनमधून ही बाब चव्हाट्यावर आलेली आहे. त्यांच्या सगळ्या भानगडी जनतेसमोर आणणार आहोत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व वांदे्र (पू़) मतदारसंघातील कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी केले.
वांद्रेतील प्रचारसभेत बोलताना त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवित भाजपा-सेनेने जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. राणे म्हणाले, की मुंबई महानगरपालिकेत अनेक वर्षे सत्ता उपभोगत असताना शिवसेनेने शहराच्या मूलभूत समस्या सोडविलेल्या नाहीत. उदरनिर्वाहाचे साधन बनवून जनतेचा पैसा उद्धव ठाकरे व अन्य नेत्यांची लुबाडला आहे. शिवसेनाप्रमुखांनी प्रत्येक सैनिकाला स्वाभिमानाने जगण्याचे शिकविले, मात्र उद्धव ठाकरे लाचारीचे जिणे जगत आहेत. त्यांच्या महापौरच टक्केवारीची भाषा करीत असतील तर तेथे विकास कसा होणार?
या सर्वांनी टक्केवारीतून स्वत:च्या तुंबड्या भरून घेतल्या. बाळासाहेबांनी या पक्षाला कष्टाने वाढवले, मात्र आता या पक्षात पैसे घेऊन तिकिटे दिली जातात. जेथे उमेदवारांनाच तिकिटासाठी पैसे मोजावे लागतात त्यांच्याकडून सामाजिक कामाची काय अपेक्षा ठेवणार? मी केलेला दावा फेटाळल्यास अशाप्रकारे तिकीट मिळविलेल्या ५० जणांची यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी जाहीर
केले. (प्रतिनिधी)

Web Title: Mata Ishwar's money for Mumbai Municipal Corporation