आजीची हत्या करून मनोरुग्णाकडून शवाची शेकोटी
By Admin | Updated: September 14, 2016 06:40 IST2016-09-14T06:40:39+5:302016-09-14T06:40:39+5:30
मनोरुग्ण नातवाने आजीची हत्या करून शवाची मध्यरात्री शेकोटी केल्याची हृदयद्रावक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडली. येथील हरसूल गावापासून पंधरा किमी अंतरावरील कोटंबी या आदिवासी गावात सोमवारी

आजीची हत्या करून मनोरुग्णाकडून शवाची शेकोटी
अझहर शेख, नाशिक
मनोरुग्ण नातवाने आजीची हत्या करून शवाची मध्यरात्री शेकोटी केल्याची हृदयद्रावक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडली. येथील हरसूल गावापासून पंधरा किमी अंतरावरील कोटंबी या आदिवासी गावात सोमवारी रात्री हा दुर्दैवी प्रकार घडला.
माळरानावर एका झोपडीत भगवान भोये, आई रखमीबाई(८५), पत्नी चिमीबाई व मुलगा कैलास (२२) यांच्यासह राहतात. कैलास मोलमजुरी करतो. तो निर्व्यसनी आहे, मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून तो मनोरुग्णाप्रमाणे वागू लागल्याचे नातेवाईकांनी सांगितले. सोमवारी रात्री त्याने झोपडीमध्ये गोंधळ घालत आजीची हत्या केली. तसेच आईलाही गंभीर जखमी केली. या वेळी भगवान गावामध्ये भागवत कथेचे पारायण ऐकत होते.
मंगळवारी सक ाळी दहा वाजेच्या सुमारास भगवान भोये व अन्य नातेवाईकांनी हरसूल पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार कथन केला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता अर्धवट स्थितीत जळालेले रखमाबाईचे प्रेत व संशयित कैलासही अर्धनग्न अवस्थेत प्रेताजवळ बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्यास अटक केली असून उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.