शिर्डी मार्गावरील लूटमार करणाऱ्या टोळीचा मास्टर माईंड जेरबंद
By Admin | Updated: May 31, 2016 22:25 IST2016-05-31T21:06:00+5:302016-05-31T22:25:28+5:30
गेल्या आठवड्यात मनमाड शिर्डी मार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीतील फरार दोन आरोपीना जेरबंद करण्यात मनमाड शहर पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीचा मास्टर माईंड देविदास शिवाजी

शिर्डी मार्गावरील लूटमार करणाऱ्या टोळीचा मास्टर माईंड जेरबंद
ऑनलाइन लोकमत
मनमाड, दि. 31 - गेल्या आठवड्यात मनमाड शिर्डी मार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीतील फरार दोन आरोपीना जेरबंद करण्यात मनमाड शहर पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीचा मास्टर माईंड देविदास शिवाजी कसबे याला मनमाड रेल्वे स्थानक परिसरातून अटक करण्यात आली.येथील वेश्या वस्ती मधील महिलेकडून लूटमार करण्यासाठी माहिती पुरवली जात असल्याचा धक्का दायक प्रकार उघड झाला आहे.
26 तारखेच्या पहाटे मनमाड शिर्डी मार्गावर संशयास्पद तवेरा गाडीसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना मनमाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ राहुल खाडे, पो नि पुंडलिक सपकाळे यांच्या पथकाने पाठलाग करून पकडले. यातील दोन जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले होते. पोलिसांनी पकडलेल्या आरोपी कडून मोठ्या शिताफीने फरार आरोपींची माहिती मिळवली. त्या नुसार रेल्वे स्थानक परिसरातून देविदास शिवाजी कसबे (20) रा श्रमिक नगर नासिक याला ताब्यात घेतले. पाचवा संशयित आरोपी अनिस पठाण हा स्थानिक मनमाड येथील असल्याचे कसबे याने सांगितले. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे
मनमाड येथील वेश्या वस्ती मध्ये गेलेल्या बाहेर गावच्या ट्रक चालका कडे अधिक रोकड रक्कम असल्यास त्या ट्रक चा नं व इतर माहिती तेथील महिला मोबाईल वरून या टोळीतील इसमाला देत . सदर ची गाडी अनकाइ बारीत गेल्यानंतर दबा धरून बसलेल्या टोळीकडून गाडी अडवू न लूटमार केली जात. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.यामध्ये अजूनही काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.अधिक तपास पो नि पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शना खाली प्रल्हाद बनसोडे हे करत आहे.