सोनिया व राहूल गांधींच्या सभेसाठी नागपूरात प्रचंड गर्दी

By Admin | Updated: April 11, 2016 18:28 IST2016-04-11T16:33:32+5:302016-04-11T18:28:04+5:30

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहूल गांधी नागपूरात दाखल झाले असून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशासमोर ध्यान केले.

Massive crowd at Nagpur for Sonia Gandhi and Rahul Gandhi's meeting | सोनिया व राहूल गांधींच्या सभेसाठी नागपूरात प्रचंड गर्दी

सोनिया व राहूल गांधींच्या सभेसाठी नागपूरात प्रचंड गर्दी

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 11 - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहूल गांधी नागपूरात दाखल झाले असून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशासमोर ध्यान केले. कस्तुचंद पार्कमध्ये संध्याकाळी सोनिया गांधी व राहूल गांधी यांची सभा होणार आहे. दीक्षाभूमी ट्रस्ट व भंतेजींकडून स्वागत झाल्यानंतर दोघांनीही बुद्ध प्रतिमेला वंदन केले. त्यांची सभा थोड्याचवेळात कस्तुरचंद पार्कमध्ये सुरू होणार असून सभेसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. सोनिया व राहूल गांधी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह सभास्थानी हजर झाले आहेत.

त्यांच्यासमवेत दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आदी ज्येष्ठ नेते आहेत. राहूल गांधी आज नागपूरात मुक्काम करणार आहेत.

दीक्षाभूमीच्या डायरीमध्ये राहूल गांधींनी संदेश लिहिला आहे. 

लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी सोनिया गांधी व राहूल गांधींचे स्वागत केले.

 

सभेला झालेली गर्दी

 

 

Web Title: Massive crowd at Nagpur for Sonia Gandhi and Rahul Gandhi's meeting