मैेत्रीचे नाटक करून तरुणीवर सामूहिक अत्याचार

By Admin | Updated: January 9, 2017 04:51 IST2017-01-09T04:51:06+5:302017-01-09T04:51:06+5:30

मैत्रीचे नाटक करून मादक द्रव्य पाजून, भार्इंदरमधील २९ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना ठाण्याच्या एका

Mass torture on the girl by drama | मैेत्रीचे नाटक करून तरुणीवर सामूहिक अत्याचार

मैेत्रीचे नाटक करून तरुणीवर सामूहिक अत्याचार

ठाणे : मैत्रीचे नाटक करून मादक द्रव्य पाजून, भार्इंदरमधील २९ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना ठाण्याच्या एका हॉटेलमध्ये, तसेच मुंबईतील पवई भागात घडली. या प्रकरणी आधी पवई आणि नंतर ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबईतील एका दुकानात ही २९ वर्षीय पीडित तरुणी कामाला आहे. तिच्या दुकानात बॅग आणि काही सामान खरेदीच्या बहाण्याने गणपत पुरोहित रा. मुंबई यायचा. तिथेच त्यांची ओळख झाली. याचाच गैरफायदा घेत, त्याने तिच्याशी मैत्रीचे नाटक करीत तिला आधी पवई परिसरात नेले. नंतर, मार्च २०१३ मध्ये ठाण्याच्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये मादक द्रव्य पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. किशोर जैन आणि किरण जैन या त्याच्या मित्रांनीही त्याच्यासह पुन्हा त्याच ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यादरम्यान, त्यांनी अनैसर्गिक अत्याचारही करून तिला बदनामी करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार २०१३ ते २०१६ या चार वर्षांच्या काळात सुरू असल्यामुळे, आपल्याला काहीच प्रतिकार करता आला नसल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत, तिने पवई पोलीस ठाण्यात ३ जानेवारी २०१७ रोजी तक्रार दाखल केली. संपूर्ण प्रकार ठाण्याच्या हॉटेलमध्ये घडल्याने, हे प्रकरण वर्तकनगर पोलीस ठाण्यात ७ जानेवारी रोजी वर्ग करण्यात आले आहे. फिर्यादीची चौकशी बाकी असल्याने, आरोपींना अद्याप अटक केली नसल्याचे पोलीस निरीक्षक एम. एन. सातदिवे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Mass torture on the girl by drama